rto-pune 
पुणे

लायसन्स, परमीटसाठी डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  ड्रायव्हिंग लायसन्स, परमीटची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत संपली तरी काळजी करू नका. कारण ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्व राज्यांनी या आदेशाची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असे केंद्र सरकारने बजावले आहे. तसेच पोलिसांनीही नागरिकांना त्रास होईल, असे वर्तन करू नये, असे स्पष्ट केले आहे. 

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात देशाच्या सर्व भागांतील प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) 25 मार्च ते जूनपर्यंत बंद होती. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर "आरटीओ' टप्प्याटप्प्याने सुरू झाली. ज्यांची ड्रायव्हिंग लायसन्स, सर्व प्रकारच्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, परमीट आदींची मुदत 1 फेब्रुवारीनंतर संपली असेल, अशांची मुदत केंद्र सरकारने यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली होती. मात्र दरम्यानच्या काळातही आरटीओ कार्यालये पुरेशा क्षमतेने सुरू होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने 24 ऑगस्ट रोजी पुन्हा आदेश काढला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनेकांना लायसन्स, परमीटचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी. 
-बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य प्रवासी व माल वाहतूकदार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT