RTO-Pune 
पुणे

शहरातील 10 वाहनवितरकांचे परवाने आरटीओकडून निलंबित

सकाळवृत्तसेवा

पुणे - नोंदणी होण्यापूर्वीच वाहन ग्राहकाच्या ताब्यात दिल्याबद्दल शहरातील 10 वितरकांची नोंदणी प्रमाणपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) 7 दिवसांसाठी निलंबित केली.

वाहनांची नोंदणी होण्यापूर्वी ते वाहन ग्राहकांच्या ताब्यात देण्याचे प्रकार सध्या वारंवार घडत आहेत. याबाबत आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी झाल्या होत्या. तसेच, नोंदणी न केलेल्या वाहनांचे अपघात झाल्यावर विमाविषयक प्रश्न उद्भवत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाने तपासणी केली. त्यात दुचाकीच्या 9 आणि एका रिक्षा वितरकाने नोंदणी करण्यापूर्वीच वाहन ग्राहकांच्या ताब्यात दिल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक अधिकारी संजय राऊत यांनी संबंधित वितरकांवर कारवाई केली. त्यांना खुलासा सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT