crime esakal
पुणे

Pune Crime : पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा

पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची सुनावली.

प्रशांत पाटील

पुणे - पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या चौघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.

हैदर जावेद सय्यद (वय १८, रा. विजयनगर, काळेवाडी), विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी ऊर्फ भिलारे (वय २१), साजीश अशोक कुरवत (तिघेही रा. काळेवाडी) आणि अविनाश गौतम बनसोडे (वय १८, रा. हिंद केसरीनगर, बोपखेल) अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत.

राकेश नामदेव घुले (वय २५, रा. बोपखेल) यांचा २१ नोव्हेंबर २०१० मध्ये खून करण्यात आला होता. त्या प्रकरणी शिक्षा झालेल्या चौघांसह एकूण सात जणांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींपैकी एक जण गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन होता. तर, एका आरोपीचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला आहे. अन्य एका आरोपीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याची सुनावणी स्वतंत्र घेण्यात येत आहे. शिक्षा सुनावण्यात आलेले चौघेही सप्टेंबर २०१२ पासून १६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कारागृहात होते.

मार्च २०१० मध्ये राकेश यांनी यातील आरोपींवर बोपखेल येथे वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात राजेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी आपसांत संगनमत करून २१ नोव्हेंबर २०१० ला राजेश यांना थेरगावमधील काळेवाडी फाटा येथे गाठून त्यांच्या हातावर, डोक्यावर, पाठीवर कोयत्याने तब्बल ३६ वार करून त्यांना जीवे मारले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या कोयत्यांपैकी दोन कोयते गुन्ह्याच्या घटनास्थळी सापडले होते.

राकेश यांच्या कुटुंबीयांना पाच लाख नुकसान भरपाई

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी ११ जणांची साक्ष घेतली. त्यातील डॉक्टर आणि फिर्यादी असलेले प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

दंडाच्या रकमेतून पाच लाख रुपये राकेश यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे. गुन्हेगारांनी दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT