court esakal
पुणे

Life Imprisonment : पतीच्या खून प्रकरणी पत्नीला जन्मठेप

पतीचा दगडाने ठेचून, विळ्याने वार करुन खून केल्याच्या खटल्यात शोभा अनिल इंगळे हिला येथील जिल्हा न्यायाधिश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

पतीचा दगडाने ठेचून, विळ्याने वार करुन खून केल्याच्या खटल्यात शोभा अनिल इंगळे हिला येथील जिल्हा न्यायाधिश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बारामती - पतीचा दगडाने ठेचून, विळ्याने वार करुन खून केल्याच्या खटल्यात शोभा अनिल इंगळे (रा. साळोबावस्ती, खुटबाव, ता. दौंड) हिला येथील जिल्हा न्यायाधिश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अनिल संतोष इंगळे यांचा या घटनेत खून झाला होता. दौंड तालुक्यातील खुटबाव येथे 23 ऑगस्ट 2015 रोजी ही घटना घडली होती. अनिल संतोष इंगळे व शोभा अनिल इंगळे या पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती. याच कारणावरून शोभा हिने पतीच्या डोक्यात दगड घातला तसेच विळ्याने वार करत पतीचा खून केला होता. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ सुनील संतोष इंगळे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार शोभा हिच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अधिकारी आर. के. गवळी यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी महिलेविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून दहा साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील सुनील वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने भादंवि कलम 302 नुसार जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शोभा इंगळे हिला सुनावली. यवत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मदने यांनी काम पाहिले. पोलीस नाईक वेणूनाद ढोपरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एन. ए. नलवडे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT