Life imprisonment for the husband murder his wife  
पुणे

माहेरहून पैसे आणत नाही म्हणून पत्नीला दिले दरीत ढकलून; पतीला जन्मठेप

सकाळवृत्तसेवा

पुणे : फिरायला आणि सोने खरेदीच्या बहाण्याने घेऊन जात पत्नीचा वरंधा घाटातील दरीत ढकलून देत खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा निकाल दिला. पत्नीला माहेरहून पैसे आणावेत म्हणून त्यांना सासरची मंडळी त्रास देत होती.

विक्रम शंकर शेवते (वय ४०, रा. मांजरी रस्ता, हडपसर) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुनीता यांचा खून झाला होता. याबाबत सुनीता यांच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १३ जुलै २०१२ रोजी घडली होती. खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी १९ साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलिस निरीक्षक अजित खडके यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल पी. पी. पवार, ए. एस. गायकवाड यांनी मदत केली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी सुनीता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असत. त्रास असह्य झाल्याने सुनीता यांच्या वडिलांनी एक लाख रुपये मुलीच्या सासरच्यांना दिले होते. त्यानंतरही पैशासाठी त्यांना त्रास देण्यात येत असत. मागणी पूर्ण करत नसल्याने विक्रम याने पत्नीला कारमधून फिरविण्याच्या बहाण्याने भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाट येथे नेले. तेथील कावळाकडा येथे पत्नीला दरीत ढकलून दिले होते. न्यायालयाने भादवी दंड संहिता कलम ३०२ (खून) नुसार जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंड आणि भादवी कलम ४९८ (अ) नुसार एक वर्षे साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पत्नी पळून गेल्याचा केला बनाव :
आपल्याला दागीणे खरेदी करायचे आहे, असे सांगून विक्रम पत्नीला माहेरहून घेऊन गेला व तिचा खून केला. सुनीता या संध्याकाळी परत न आल्याने त्यांच्या आईवडिलांनी विक्रमकडे विचारणा केली. त्यावर त्याने सुनीता काळूबाईला गेल्याचे सांगितेल. त्यानंतर मी प्रियकराबरोबर पळून जात असल्याची चिठ्ठी सुनीता यांनी लिहिल्याचे विक्रम याने त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. मात्र ती चिठ्ठी सुनीता यांनी लिहिलेले नव्हती. खून लपविण्यासाठी ती पळून गेल्याचा बनाव विक्रम याने केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT