court 
पुणे

महिलेच्या खूनप्रकरणी तरुणीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

पुणे-  पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविले; तसेच बालकासह एका महिलेचे अपहरण केले व नंतर तिचा खून केला. या प्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला.

निकिता संजय कांगणे (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. मधू रघुनंदन ठाकूर यांचा खून झाला होता. त्यांचे पती रघुनंदन (वय २३, रा. वैदवाडी, हडपसर, मूळ उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली होती. अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी तेरा साक्षीदार तपासले. त्यांना फिर्यादीच्या वकील ॲड. जेसिंता डेव्हिड आणि हवालदार आबासाहेब गायकवाड, चंद्रशेखर जाधव यांनी मदत केली. तर तीन महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यातर्फे ॲड. इब्राहिम शेख यांनी काम पाहिले. लक्ष्मी ऊर्फ पिंकी बालाजी जाधव (वय १९, रा. टाकळी, ता. देगलूर, जि. नांदेड) ही माफीचा साक्षीदार बनली. 

लक्ष्मी ही निकिता हिच्या घरी राहत होती. मुलाला पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने मधू आणि त्यांच्या मुलाचे अपहरण केले. त्यांना निकिताच्या घरात डांबून ठेवले होते. तिथे मधू यांच्या चेहऱ्यावर लाल मिरचीची पूड टाकली. 

आरडाओरड केल्यानंतर त्यांचा मच्छरदणीने गळा आवळून खून केला. नंतर मृतदेह मच्छरदाणीत बांधून समोर राहणाऱ्या एका महिलेच्या पलंगाखाली टाकला. तसेच त्यांचा मोबाईल फोडून पुरावा नष्ट केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Update: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

Metro Tunnel: मुंबई मेट्रोला धोका! बेकायदेशीर बोअरवेलमुळे बोगद्यात भगदाड; मोठा निष्काळजीपणा उघड, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पाचोर्‍यात भरधाव ट्रकने उडवले इलेक्ट्रिक पोल

Jalgaon News : जळगाव बसस्थानकावर स्मार्ट कार्डचा बोजवारा! पहाटेपासून रांगेत उभे राहूनही प्रवाशांना रिकाम्या हाती परतावे लागले

खेळाडूंचे कल्याण, हक्कांच्या बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी- २० लीग नाही! WCA चा धक्कादायक अहवाल, नव्या लीग टॉपर...

SCROLL FOR NEXT