शनिवारवाडा : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या गोलूने पोकलेनवरच थाटलेला संसार.
शनिवारवाडा : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या गोलूने पोकलेनवरच थाटलेला संसार. 
पुणे

Coronavirus : ‘जिंदगी चलती रहनी चाहिये...’

गणेश कोरे

पुणे - कोरोना लॉकडाउनमध्ये अनेकजण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही जण मानसिकदृष्ट्या खचले आहेत, तर काहीजण या संकटाला धीराने तोंड देत आहेत. यामधील एक आहे गोलू. गोलू कुमार उत्तरप्रदेशच्या सोन्दा गावातील तरुण. पोकलॅन ऑपरेटर. शनिवारवाड्यालगत सध्या पोकलॅनचे केबीन हेच त्याचे विश्‍व बनले आहे. पोकलेनमध्येच राहणे, तथेच स्वयपांक करणे आणि येणाऱ्या दिवसाला सकारात्मकतेने तोंड देणे ही त्याची दिनचर्या.

लॉकडाउनला एक महिना झाल्यानंतरही अडकून पडलेला गोलू कोसो दूर असलेल्या आई, बहिणी आणि लहान भावाच्या आठवणीने व्याकूळ झाला आहे. तरी त्याने धीर सोडलेला नाही. गोलू म्हणाला, ‘एक महिन्यापूर्वी पोकलेनवर कंत्राटदार देवकर शेठच्या ओळखीने आलो. शनिवारवाड्यालगत गटाराचे काम सुरु होते. मात्र अचानक लॉकडाउन सुरु झाला. माझ्या बरोबरचा एक जण ट्रेन बंद होण्याच्या अगोदर एक दिवस गावाला गेला. मात्र मी लॉकडाउनमध्ये अडकलो. गावाकडे आई, पाचवीत शिकणारा लहान भाऊ आणि महाविद्यालयात शिकणारी बहीण आहे. आई काळजीने रोज फोन करते ‘इकडे निघून ये’, पण आता जाता येत नाही.’’ त्यामुळे पोकलेनचे केबीनच त्याने विश्‍व झाले आहे.

भावुक होऊन गोलू म्हणतो, ‘‘साहब जिंदगी है..चलती रहनी चाहिये,’’ असा स्वतःलाच आत्मविश्‍वास देत भात परतू लागतो, त्याने संसार थाटलेल्या पोकलेनवर. दिवस पोकलेनच्या केबीनमध्ये मोबाईलवर गाणी ऐकत काढायचा. रात्री पोकलेवरच स्वयंपाक करायचा आणि केबिनच वन आरके फ्लॅट समजून त्यातच झोपायचं. आंघोळीसाठी समोरच असलेल्या पालिकेच्या स्नानगृहाचा वापर करायचा. एरव्ही शनिवारवाड्यालगत असलेल्या खाऊ गल्लीत विविध चमचमीत पदार्थ खायला मिळाले असते. मात्र आता लॉकडाउनमध्ये पोकलेनच त्याचा सख्खा सोबती आणि विश्‍व झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT