horn 
पुणे

पुणेकरांनो, हॉर्नला द्या एक दिवस विश्रांती

सकाळवृत्तसेवा

पुणे - लाइफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलिस (वाहतूक विभाग) यांच्या वतीने ‘नो हाँकिंग डे’ अर्थात एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती, अशी संकल्पना राबविण्यात येत आहे.

पुण्यात साधारणतः दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील ९० टक्के हॉर्न अनावश्‍यक असतो. त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी शनिवारी (ता. १२) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाइफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू व प्रा. पद्माकर पुंडे यावेळी उपस्थित होते. कोरोनामुळे यंदा मुख्य कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात होणार असून शनिवारी दुपारी बारा वाजता प्रातिनिधिक स्वरूपात टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टिल्लू म्हणाले, ‘‘शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. परंतु आपण त्यांना  विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून शहरातील विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचे आवाहन देखील पुणेकरांना आम्ही करत आहोत.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT