baramati
baramati 
पुणे

उंडवडी सुपेत पोलिस पाटिल यांच्या घरावर वीज कोसळली, जीवितहानी नाही 

विजय मोरे

उंडवडी - 'वेळ आली होती.... पण काळ नव्हता' .. या प्रचलित म्हणीचा प्रत्यय नुकताच बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेकराना आला. त्याला कारणही तसेच होते, गुरुवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान येथील पोलिस पाटील सविता उद्धव गवळी यांच्या स्लॅबवर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

गुरुवारी (ता. 28) रात्री साडे नऊच्या दरम्यान उंडवडी सुपे परिसरात वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. यावेळी येथील पोलिसपाटील सविता गवळी व त्यांचे पती उद्धव लक्ष्मण गवळी हे दोघे घरात जेवण करत होते. यावेळी पावसात अचानक वीजेंचा मोठा कडकडाट झाला आणि एक आगीचा गोळा गवळी यांच्या घरावर पडला. 

आगीचा गोळा घराच्या भिंतीवर आदळल्यानंतर मोठा कर्कश्श आवाज झाला आणि भिंतीच्या विटा बाजूला फेकल्या गेल्या. अक्षरक्षा त्या वीटेचा चुराडा झाला असून भिंतीला भेगा गेल्या.गवळी यांचे स्लॅबचे दोन मजली घर आहे. वीजेचा गोळा दुसऱ्या मजल्यावरील भिंतीच्या कोपऱ्याला घासून गेल्याने भिंतीच्या वीटा बाजूला पडल्या. 

या घटनेनंतर गवळी यांच्या घरातील विद्युत उपकरणेही जळाली. तसेच गावातील अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब झाली आहेत. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी आर्थिक स्वरुपाचे पोलिस पाटील यांच्यासह गावातील लोकांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सकाळी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळाला भेट देवून गवळी यांची विचारपूस केली. 

याबाबत पोलिस पाटील सविता गवळी म्हणाले, " आम्ही जेवण करत असताना घरावर वीजेचा मोठा आवाज झाला. आमच्या काळजाचं पाणी - पाणी झाले. या घटनेनंतर आम्ही दोघेही प्रचंड गोंधळून व घाबरून गेलो होतो. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. " 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT