बारामतीत विज पडून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यु 
पुणे

बारामतीत विज पडून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यु, एक गंभीर जखमी

कुरणेवाडी-सगोबाचीवाडी हद्दीतील पणदरे खिंडीच्या परिसरातील शिवारात तीन शेतकरी काम करीत होते

कल्याण पाचांगणे, माळेगाव

माळेगाव :  बारामती तालुक्यात पश्चिम पट्ट्यात विज पडून मोठी दुर्घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. कुरणेवाडी-सगोबाचीवाडी हद्दीतील पणदरे खिंडीच्या परिसरातील शिवारात तीन शेतकरी काम करीत होते. आज (सोमवार) सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास संबंधित शेतकऱ्यांच्या आंगावर वीज पडल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यु झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

शेतकरी बाळासाहेब बंडोबा घोरपडे (वय५४), संगिता बाळासाहेब घोरपडे (वय ४४, दोघे रा. सगोबाचीवाडी, ता.बारामती) हे या दुर्घटनेतील मयतांची नावे आहेत, तर पद्धमीनी घोरपडे या महिलेवर बारामती शहरातील भोईटे हाॅस्पिटलमध्ये पुढील वैद्यकिय उपचार सुरू आहेत. सध्या संबंधित जखमी महिलेला वाचविण्यासाठी सध्या शर्थिचे प्रय़त्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बारामती तालुक्यात वीज पडलेली दुर्घटना मोठी आहे, संबंधित तिनही  जखमी शेतकऱ्यांना तातडीने बारामती शहरामध्ये वैद्यकिय उपचार मिळण्यासाठी दाखल केले होते, परंतु बाळासाहेब व संगिता घोरपडे हे पती-पत्नी उपचारागोदरच मयत झाल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले. मात्र संबंधित जखमी महिला पद्धमीनी घोरपडे यांच्यावर वैद्यकिय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः संबंधित घोरपडे कुटुंबियांना तातडीने सर्वोतोपरी उपचार मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय  पाटील, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप सुरवातीपासून प्रय़त्नशिल होते. याबाबत तहसीलदार पाटील म्हणाले, "घोरपडे कुटुंबियांवर खूप मोठी नैसर्गिक अपत्ती ओढवली आहे. शासन त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहे. मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची तातडीची मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT