pune sakal
पुणे

सादलगाव येथे वीज पडून ऊसतोडणी मजूर तरुणीचा मृत्यू तर एक गंभीर

सादलगाव शिवारात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : सादलगाव ( ता. शिरूर ) येथे वीज पडून १६ वर्षीय ऊसतोडणी मजूर तरुणीचा मृत्यू झाला. रिता सिताराम नाईक ( मूळ राहणार आडशी, या. जि. नंदूरबार ) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर या तरुणीची विवाहित बहीण गीता राजेश वळवी ही यामध्ये जखमी झाली आहे. तिच्यावर मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सादलगाव शिवारात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना पाऊस सुरू झाला होता. पाऊस पडत असताना या दोघी बहिणी उसाच्या फडातून ट्रॅक्टर कसा येईना हे पाहण्यासाठी रस्त्यावर आल्या होत्या. यावेळी या दोघींवर वीज पडली. यात रीता व गीता या दोघी बहिणी बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी रीताला मृत घोषित केले तर बेशुद्धावस्थेतील गीता हीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठवले. गीता हीची प्रकृती गंभीर असल्याचे वरद विनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील पवार यांनी सांगितले. मृत रीता हीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT