पुणे

सिव्हिल पोलिस चौकी

CD

लिंबी चिंचोळीजवळ
कार उलटली
सोलापूर : सोलापूरहून कलबुर्गीकडे जात असताना लिंबी चिंचोळी येथे नियंत्रण सुटून कार रस्त्यालगतच्या शेतात उलटली. या अपघातात दोघे जखमी झाले असून, अपघात सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. मोहम्मद इब्राहिम महिबूबसाब (वय ३०) व मोहम्मद हुसेन अब्दुल रजाक मुल्ला (वय २९, दोघेही रा. कलबुर्गी) अशी जखमींची नावे आहेत. दोघेही चारचाकीतून सोलापूरहून कलबुर्गी येथे जात होते. लिंबी चिंचोळी येथे आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार शेतात उलटली. यात मोहम्मद इब्राहिम यांच्या डाव्या खांद्याला व हाताला मुकामार लागला, तर मोहम्मद हुसेन यांच्या हाताला जखम झाली. दोघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दुचाकी घसरून
एकाचा मृत्यू
सोलापूर : पाटकूल ते पेनूर मार्गावर दुचाकी घसरून पापरी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. धन्यकुमार नंदकुमार माळवदकर (रा. पापरी, ता. मोहोळ) असे मृताचे नाव आहे. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास पेनूरजवळ त्यांची दुचाकी घसरली. रस्त्यावर पडल्याने धन्यकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयातून १५ सप्टेंबरला त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

पैशाच्या हिशेबाच्या
कारणातून मारहाण
सोलापूर : पैशाच्या हिशेबाच्या कारणावरून ५० वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली. भुताळी अमोग पुजारी (रा. अक्कलकोट) यांना २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रुद्देवाडी येथे अजित अमोगी पुजारी व नागनाथ भुताळी पुजारी यांनी मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना अक्कलकोटच्या सरकारी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोनापुरे चाळीत
दोन गटांत हाणामारी
सोलापूर : कोनापुरे चाळीत रविवारी रात्री किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील लोक जखमी झाले. रोहन मरेप्पा म्हेत्रे (वय २१), अनिता मरेप्पा म्हेत्रे (वय ३८) व राजेश सिद्राम मोगले (वय ३४, तिघेही रा. कोनापुरे चाळ) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी रात्री नऊच्या सुमारास प्रतिक माशाळकर, ऋत्विक माशाळकर व अन्य दोघांनी रोहन, अनिता व राजेश यांना लेझिम व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात रोहनच्या डोक्याला, तर अनिताला मुकामार लागला. घराजवळील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या रेणुका अनिल माशाळकर (वय ४०) यांनाही रोहन म्हेत्रे, प्रेम म्हेत्रे व अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT