line for shahari garib card
line for shahari garib card sakal
पुणे

‘शहरी गरीब’च्या कार्डासाठी रांग

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेतर्फे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना शहरी गरीब योजनेच्या अंतर्गत दरवर्षी उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत केली जाते.

पुणे - महापालिकेच्या (Pune Municipal) शहरी गरीब योजनेचे (Shahari Garib Card) नवे कार्ड काढणे, जुन्या कार्डचे नूतनीकरण करणे, यासाठी दररोज शेकडो नागरिक (Citizens) महापालिकेत येतात. पण, या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसणे, एजंटाकडून आलेल्या प्रस्तावांना प्राधान्य देणे, यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. परिणामी, भर उन्हात त्यांना रांगेत थांबावे लागत आहे.

पुणे महापालिकेतर्फे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना शहरी गरीब योजनेच्या अंतर्गत दरवर्षी उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत केली जाते. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, मिळकतकराची पावती, रेशन कार्ड यासह इतर कागदपत्रांची गरज असते. त्याआधारे शहरी गरीबचे कार्ड मिळाल्यानंतर एका वर्षासाठी दोन लाखापर्यंतची आर्थिक मदत महापालिका करते. त्याचा आधार शहरातील सुमारे १५ हजार कुटुंब याचा लाभ घेतात.

शहरी गरीब योजनेचे कार्ड काढणे, जुन्या कार्डचे नूतनीकरण करणे, यासाठी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी स्वतंत्र रांग आहे, तर इतरांसाठी स्वतंत्र रांग आहे. सकाळी दहाच्या सुमारास काम सुरू होते, पण सकाळी पावणे अकरा वाजून गेले; तरी सर्व कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याने कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे लांब रांगा लागत आहेत. तसेच, या योजनेचे कार्ड काढून देण्यासाठी एजंटाकडून एकाच वेळी १०-१५ अर्ज दिले जात असल्याने त्यांचे काम होईपर्यंत इतर नागरिक एकाच जागी थांबून राहतात. वेळ का लागत आहे, याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. एजंटामार्फत स्वीकारले जाणारे अर्ज बंद केले जाणार असून, संबंधित कुटुंबातील व्यक्ती या कामासाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. कर्मचारी उपस्थित राहत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करू. तसेच, अधिक मनुष्यबळ देण्यात येईल.

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT