MOH26B03720, MOH26B03721
मोहोळ ः लिंगायत समाजाच्या वतीने पोविस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले, तर दुसऱ्या फोटोत घेतलेले शेततळे.
लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत शेततळे; चौकशीची मागणी
जुनी थडगी उकरल्याचा समाजाचा आरोप; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून शुक्रवारी तळे बुजविण्याची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. ५ : मोहोळ-नरखेड रस्त्यालगत लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत शेततळे करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कामात जुन्या थडग्यांना उकरण्यात आल्याचा आरोप लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांनी केला असून, संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मोहोळ शहरात मीवायाकी प्रकल्पांतर्गत वृक्षलागवडीचे काम सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ठेकेदारी पद्धतीने सुरू आहे. यासाठी मोहोळ नगरपरिषदेची एक हेक्टर जागा देण्यात आली आहे. या जागेलगत लिंगायत समाजाची स्मशानभूमी असून, त्याच्या लगतच वृक्षलागवडीचे काम सुरू आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीसाठी दिलेल्या जागेत शेततळे तयार करून त्यात पाणी सोडल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या प्रकरणात सामाजिक वनीकरण विभागाचे संबंधित अधिकारी, काम करणारी यंत्रणा अन् संबंधित मजूर सहकारी संस्थेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न संवेदनशील असल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अतुल क्षीरसागर, नगरसेवक अजय कुर्डे, किशोर वस्त्रे, भारत नाईक, नागेश बिराजदार आदींच्या सह्या आहेत.
कोट
- आमच्या कर्मचाऱ्यांकडून चूक झाली आहे. याबाबत समाजातील व्यक्तींना पूर्ण माहिती देणे गरजेचे होते. स्मशानभूमीच्या क्षेत्रात शेततळे झाले आहे; मात्र त्या ठिकाणी कोणत्याही समाध्या नव्हत्या. प्रत्यक्ष पाहणीनंतर ते शेततळे शुक्रवारी बुजविण्यात येईल.
- डी. वाय. कुलकर्णी वनपरिक्षेत्र अधिकारी
आम्ही त्या ठिकाणी फक्त झाडे लावण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. शेततळे घेण्यासाठी कोणतीही लेखी परवानगी दिलेली नाही.
- डॉ. योगेश डोके, मुख्याधिकारी
- फक्त खड्डा घेतो म्हणून त्या ठिकाणी शेततळे घेण्यात आले आहे. हे करताना त्या ठिकाणी जुन्या थडग्यांना उकरून अनधिकृत काम करण्यात आले आहे. याची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देणार आहोत.
- अजय कुर्डे, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.