पुणे

लायन्स लोणावळा सुप्रीमोजकडून २० गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप

CD

लोणावळा, ता. ५ : सामाजिक बांधिलकी जपत टीम लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज् यांच्या वतीने शहरातील गरजू कुटुंबे व निराधार महिलांना अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण २० कुटुंबांना प्रत्येकी पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी महिनाभर पुरेल असे रेशन किट वितरित करण्यात आले.
या रेशन किटमध्ये जीवनावश्यक अन्नधान्यासोबतच रमजानच्या पार्श्वभूमीवर शीरखुर्म्यासाठी आवश्यक साहित्यही देण्यात आले. यामध्ये रुह अफजा, शेवई, सुकामेवा आणि दूध यांचा समावेश होता. हा उपक्रम संस्थेच्या उदार व दातृत्वशील देणगीदारांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे पार पडला. क्लबच्या अध्यक्षा पीएमजेएफ सुरैय्या वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली रंजना पुट्टोल, लायन प्रीती, सुधीर कदम, एमजेएफ अमीन वाडीवाला यांच्या उपस्थितीत रेशन किट वितरण करण्यात आले.
गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी लोणावळा सुप्रीमोजची टीम नेहमीच तत्पर असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT