Lonavala  sakal
पुणे

Lonavala : लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट सायंकाळी ६ नंतर बंद;प्रांताधिकाऱ्यांचे आदेश ,पर्यटनस्थळांसाठी नियमावली जाहीर

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंटच्या परिसरात सायंकाळी ६ ते सकाळी ६ यावेळेत प्रवेशास मनाई करण्यात आली असून वन विभागाने तेथे कायमस्वरूपी वनपाल नियुक्त करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंटच्या परिसरात सायंकाळी ६ ते सकाळी ६ यावेळेत प्रवेशास मनाई करण्यात आली असून वन विभागाने तेथे कायमस्वरूपी वनपाल नियुक्त करण्याची व्यवस्था करावी, असे आदेश प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिले आहेत. याशिवाय, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काही पर्यटनस्थळांवर पोलिस पथके ही नेमण्यात येणार आहेत.

भुशी धरणामागील धबधब्याच्या प्रवाहामध्ये ५ पर्यटकांचा मृत्यू झाला. राज्य सरकारनेही या दुर्घटनेची दखल घेतली. त्यामुळे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जबाबदार पर्यटन ही संकल्पना राबविण्याच्यादृष्टीने पर्यटनस्थळांवर आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबर पर्यटकांसाठी नियमावली जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, मावळ- मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी पर्यटनस्थळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी मंगळवारपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. पोलिस, वन विभाग, नगर पालिका, रेल्वे विभागांनी संयुक्तरित्या त्याची अंमलबजावणी करावी. रस्त्यावर बॅरिकेडिंगची तात्काळ व्यवस्था करावी, असेही नवले यांनी आदेशात म्हटले आहे.

काय आहे नियमावलीत ?

  • सहारा पुलावर वाहने उभे करण्यास पूर्ण मनाई

  • सहारा पुलाच्या समोरच्या बाजूच्या तीन छोट्या धबधब्याच्या डोंगरावर जाण्यासाठी प्रतिबंध

  • भुशी धरणाच्या रेल्वे गेस्ट हाऊसमागे जाण्यासाठी सक्त मनाई

  • भुशी धरणाच्या डाव्या बाजूने वन विभागाच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी बंदी.

  • लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद.

धोकादायक ठिकाणी प्रतिबंध हवा

मावळ तालुक्यातील सहारा पूल व त्या समोरील तीन छोटे धबधबे, भुशी धरण येथील रेल्वे गेस्ट हाऊसवरचा भाग, भुशी धरणाच्या मागील भाग, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पर्यटन स्थळांवरील काही धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक होते. त्यामुळे, आता सुरक्षेसाठी पोलिस पथके ही नेमण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Rajendra Bharud Action Kolhapur : कोल्हापूर महापालिकेचे 'ऑपरेशन बुलडोजर', १४३ बांधकामांवर कारवाई होणार; आयुक्त राजेंद्र भारुडांचे आदेश

SCROLL FOR NEXT