Traffic updates 
पुणे

#TrafficUpdates : पुणेकरांनो...'या' रस्त्यावर आहे सध्या वाहतूक कोंडी 

pune

पुणे : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांना भरपावसात वाहतूक कोंडीतून वाट काढवी लागत आहे. शनिवार, रविवारच्या सुटटीत घरात बसून पावसाचा आनंद घेणाऱ्या पुणेकरांना सोमवारी (ता.8) वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

आधीच सतत कोसळणारा रिमझिम पाऊस...त्यात रस्त्यांवरील खड्डे आणि खड्डयांमध्ये साचलेले पाणी.....त्यात संथ गतीने सुरु असलेल्या कोंडी पुणेकर अडकले आहेत. रिमझिम पावसात भिजत, रस्त्यांवरील खड्ड्यांमधून वाट काढत ऑफिसला वेळेत पोहचण्याच्या गडबडीत आहेत.

पुणेकरांनो...शहरातील वाहतूक कोंडीचा थोडक्यात आढावा घ्या आणि वेळेत ऑफिसला पोहचा.

#TrafficUpdates : नळस्टॉप चौकात वाहतूक कोंडी झाली आहे. कर्वे रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची रांग म्हात्रे पुलापर्यंत लागली आहे. पटवर्धन बाग, मंत्री उद्यान भागातही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच सिग्नल बंद असल्याने वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. 

#TrafficUpdate : कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु असून  पौड फाट्यावरील उड्डाणपुल येथे वाहतूक कोंडी झाली आहे. 

#TrafficUpdate : औंध ते शिवाजीनगर मार्गावर वाहतूक कोंडी झालेलेली आहे. विद्यापीठ चौकात वाहनांची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली असून एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 
 शिवाजीनगर येथील चौकात देखील वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर दरम्यान वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : दिवाळीला धोधो कोसळणार ! 'या' १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; विजांच्या कडकडाटासह सरींची शक्यता, ‘मुरासू’ चक्रवादळही निवळणार

Vaibhav Sooryavanshi ला फक्त १५ व्या वर्षी उपकर्णधार करणे योग्य आहे? सचिन तेंडुलकरने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर, 'खूपच घाई...'

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Beed News: बीड नगर परिषदेच्या सभेत रणकंदन! महिला नगरसेविकांच्या अवमानाचा आरोप; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT