mother and baby 
पुणे

आईने बाळाला दिला पुनर्जन्म

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जेमतेम साडेआठ महिन्यांचं ते बाळ. वजन अवघे सहा किलो. त्यातच त्याला यकृताचा दुर्मिळ आजार झाला. अशा बिकट प्रसंगी जन्म देणाऱ्या आईनेच तिच्या पिल्लाला आपले यकृत देऊन जीवनही दिले.

बाळाला 'अलजाईल सिन्ड्रोम' हा दुर्मिळ जनुकीय आजार झाल्याचे निदान झाले. त्याचा आजार वेगाने वाढला. तो शेवटच्या टप्प्यात गेला. त्याच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. बाळाला त्याच्या जन्मदात्या आईनेच यकृतदान केले.

सह्याद्री हॉस्पिटल्स हेपॅटोबिलियरी व यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. बिपिन विभूते म्हणाले, ‘‘या रुग्णाला काही महिन्यांपूर्वी कावीळ झाली होती. त्याच्या यकृताची बायोप्सी व अन्य जनुकीय चाचण्यांच्या अहवालानुसार त्याला ‘अलजाईल सिन्ड्रोम’ हा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले. या बाळाची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि काविळीचे प्रमाण वाढत जातानाच यकृत खराब झाले. त्याचे वजन झपाट्याने कमी होऊ लागले व स्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली. त्यामुळे तातडीने प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. सुदैवाने त्याची आई हीच वैद्यकीय दृष्टयायोग्य अवयव दाता असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. मनिष पाठक यांनी भूलतज्ज्ञ म्हणून काम पाहिले.

डॉ. स्नेहवर्धन पांडे म्हणाले, ‘‘बालक अतिशय कमी वजनाचे व प्रकृतीने अत्यंत नाजूक असल्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक होती. ’’

अशी झाली शस्त्रक्रिया

  • १) तब्बल १० तास शस्त्रक्रिया चालली.

  • २) तीन तासानंतर बाळाला आयोसोलेशन रूममध्ये हलवले

  • ३) बालकाच्या रक्तात संसर्ग झाला.

  • ४) त्याला जुलाबही होऊ लागल्याने गुंतागुंत वाढली.

  • ५) बाळाने हिमतीने लढा दिला. त्यानंतर त्याचा रक्तदाब सुधारला व जुलाबही थांबले.

  • ६) शस्त्रक्रियेनंतर २० दिवसांनी बाळाला घरी सोडले

  • मदतीच्या हाताने दिले बळ

''बाळाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सह्याद्री हॉस्पिटल्सने विविध सामाजिक संस्थांबरोबर निधी जमा केला. टाटा ट्रस्ट, प्रवीण अगरवाल फाउंडेशन, सीएम फंड, ट्रान्सप्लांट फॉर हेल्प पुअर फाउंडेशन, सिद्धी विनायक गणपती मंदिर ट्रस्ट, मुकुल माधव फाउंडेशन, ओसवाल बंधू समाज ट्रस्ट, सह्याद्रि हॉस्पिटल यांसह अनेक वैयक्तिक दात्यांनी निधी उभारणीमध्ये मदत केली.

''कोरोना उद्रेकाच्या काळातही समन्वयाने काम करणाऱ्या आणि बाळाला नवसंजीवनी देणाऱ्या सर्व डॉक्टर आणि प्रशासनाच्या टीमचे विशेष अभिनंदन.''

- डॉ. केतन आपटे, युनिट हेड, सह्याद्री हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Pune Metro: आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! हिंजवडी मेट्रो स्थानकांना कंपन्यांची कार्यालये थेट जोडणार; पादचारी पुलांची तयारी

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

World Alzheimer Day 2026: साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT