पुणे

तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रती जनावर अनुदान द्यावे

CD

चारा-पाण्याविना पशुधन संकटात
शेतकऱ्यांवर गोठ्यातील जनावरे विकण्याची वेळ
मिरजगाव, ता. १९ : सकाळी गोठ्यात गेल्यावर गाय हंबरते; मात्र तिला घालण्यासाठी चारा नाही, अशी विदारक परिस्थिती सध्या मिरजगाव परिसरातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. १९७२ मध्ये अन्नधान्याची टंचाई होती, मात्र जनावरे होती. आज २०२६ मध्ये अन्नधान्य उपलब्ध असले, तरी पशुधन जगवण्यासाठी चारा-पाणी मिळत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आई-बापाप्रमाणे जपलेल्या गाई-बैलांना चारा-पाण्याअभावी नाममात्र किमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरांच्या बाजारात खरेदीदारांची संख्या कमी असून, काही जणांकडून जनावरांना कवडीमोल भाव सांगितला जात आहे. चारा-पाण्याच्या टंचाईचा परिणाम दुग्धोत्पादनावरही होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
मका, कडवळ आणि इतर चारा पिके संपल्याने जनावरांना खाऊ घालायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कारखान्यांकडून ऊसतोड सुरू असून, सर्व ऊस कारखान्यांकडे गेल्यास चारा टंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी किमान २० टक्के ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी होत आहे.
दुसरीकडे, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पाणी आणि रोजगाराच्या समस्येमुळे तरुण शहरांकडे स्थलांतर करीत आहेत. ‘जनावरे जगवायची की मुलांना जगवायचे?’ असा हृदयद्रावक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्यास शेतकऱ्यांना घरदार सोडून छावणीत राहावे लागते. त्यामुळे जनावरांची देखभाल करायची की कुटुंबाची, असा पेच निर्माण होतो. छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्याऐवजी शासनाने थेट अनुदान दिल्यास शेतकरी गटागटाने चारा उपलब्ध करू शकतील, असे मत व्यक्त होत आहे.
---------
शासनाने तातडीने मदत करावी
शासनाने डिसेंबरची वाट न पाहता शेतकऱ्यांना प्रतिजनावर अनुदान द्यावे. अन्यथा मिरजगाव सर्कलमधील २८ हजार पशुधनांपैकी ७० टक्के पशुधन संपण्याची भीती आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करून पशुधन वाचवावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे सदस्य राजू रणदिवे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Tukaram Munde Viral Video : तुकाराम मुंढेंचा VIDEO व्हायरल; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीशी संबंध काय?

मुंबईत नोकरी मिळाली, जॉइनिंग करण्याआधीच आक्रीत घडलं, २३ वर्षीय तरुणीला नराधमाने संपवलं, पुलावरून ओढत नेत...; कुडाळमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ३ महिन्यांच्या खंडानंतर तुरळक पाऊस; तरीही जिल्ह्यात दुष्काळी चिंता कायम

SCROLL FOR NEXT