पुणे

सांगली : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचा विमा उतरवा

CD

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचा विमा उतरवा
-------
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष; विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचे शासकीय अनुदान
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : जिल्ह्यात संभाव्य टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी राष्ट्रीय पशुधन विमा योजनेंतर्गत आपल्या पशुधनाचा किमान एक वर्षाचा विमा तातडीने उतरवून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.
जिल्ह्यात दुष्काळ आणि चारा-पाणीटंचाईच्या काळात साथीचे आजार, कुपोषण, वाढते तापमान, अपघात किंवा अन्य प्रतिकूल परिस्थितीमुळे दुभत्या व उपयुक्त पशुधनाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने राष्ट्रीय पशुधन विमा योजना सुरू केली आहे.
या योजनेत विमा हप्त्याच्या ८५ टक्के रक्कम शासन अनुदान म्हणून देते. पशुपालकांना केवळ १५ टक्के हिस्सा भरावा लागतो. दुधाळ गायीला ७० हजार, म्हशीला ८० हजार, तर बैलाला ७० हजार आणि रेड्याला ८० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दहा पशुधनाचा विमा काढता येतो. विम्यासाठी ‘एआयसी सारस’ ॲपवर नोंदणी, पशुधनाच्या कानात १२ अंकी टॅग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. विमा कालावधीत पशुधनाचा मृत्यू झाल्यास २४ तासांत विमा कंपनीला कळवावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे पिछाडीवर; सतेज पाटलांचे सहा शिलेदार आघाडीवर; आघाडीवर, पिछाडीवर असणाऱ्या उमेदवारांची वाचा यादी

Jitendra Awhad: तुझ्या दारात आलोय, आत सोडायला सांग; जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्हा हादरला! दानोळीत सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून; गावच्या राजकारणात होता सक्रीय

टायगर श्रॉफ फुटबॉल खेळायला टर्फवर गेल्याचं हल्लेखोरांना कसं समजलं? पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : गोकुळ निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष! 'क्रॉस व्होटिंग'मुळे निकालाची उत्कंठा शिगेला, अवघ्या १०० ते ३०० मतांच्या फरकाने उमेदवारांच्या विजयाची शक्यता

SCROLL FOR NEXT