Youth-Work 
पुणे

जिवंत झ-याचे पाणी वन्यजीव आणि पशुपक्ष्यांसाठी तरुणांनी उपलब्ध केले

रामदास वाडेकर

कामशेत - मावळ तालुक्यातील नेसावेच्या गावकुसा बाहेरील विहीरी पाणवठे आटले की, या झ-यातील सुमधूर थंड पाणी गावकऱ्यांची तहान भागवायचे.वाटसरूना आणि  पाणी टंचाईत धनगर बांधवांना याच झ-याच आधार. गावच्या मागील कित्येक पिढ्यांनी हे पाणी प्याले.वीस वर्षापूर्वी गावात नळ आले आणि हा पाझरता झरा दुर्लक्षित झाला. गावकऱ्यांना त्याचा विसर पडला नाही, पण त्याकडे कानाडोळा झाला.

या झ-याकडे लाॅकडाऊन आणि संचारबंदीत घरात अडकलेल्या तरुणांची लक्ष गेले. आणि वसुंधरा दिनाचे औचित्य साधून ही मंडळी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या झ-याकडे खोरे, घमेल, टिकाव, कुदळ घेऊन पोहचली. आणि त्यांनी या झ-याच्या भोवती पडलेला मातीचा ढीग, झाडाझुडपाचा पालापाचोळा, झाडाची लाकडे, साली बाजूला काढले. त्याची साफसफाई केली आणि डोंगराच्या मध्यावरच्या काळ्या पाषणातील पाण्याचा जिवंत झ-याचे पाणी वन्यजीव आणि पशुपक्ष्यांसाठी उपलब्ध केले. ज्या पाणवठ्याने  नेसावेच्या कित्येक पिढ्यांना पाणी दिले, तोच पाणवठा आज पशुपक्षी आणि वन्यजीवांची तहान भागवणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या  जिवंत पाण्याच्या झ-यात पुन्हा माती,दगड,पालापाचोळा पडून तो बुजून जावू नये, यासाठी कायम स्वरूपी  उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा अंकुश शिरसट, बाळासाहेब शिरसट, विठ्ठल शिरसट, देवराम शिरसट, नवनाथ शिरसट यांच्यासह अन्य तरुणांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT