कळवळा नव्हे, कर्जवसुली थांबविण्याचा खटाटोप
आमदार सचिन कल्याणशेट्टी : रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल
---
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांविषयी, सभासदांसाठी कळवळा नाही तर त्यांची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी असलेली प्रक्रिया थांबवता येते का, यासाठी प्रयत्न असल्याचा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अकलूजमध्ये झालेल्या बैठकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मांडलेल्या मुद्यावर आज आमदार कल्याणशेट्टी यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला.
कल्याणशेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बॅंकेसाठी पॅनेल तयार केले जाईल. तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल, बॅंक वाचवायची असेल तर तुम्ही शांत बसा. आपोआप बॅंकेची निवडणूक बिनविरोध होईल, त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायची काय गरज आहे. आमची सर्वांचीही बिनविरोधची तयारी आहे. बिनविरोध करायची म्हणायचं, सगळ्यांना भेटायचं आणि त्यात काहीतरी मांडून ठेवायचं, असा घाणेरडा प्रकार शेतकऱ्यांच्या बॅंकेत अजिबात करू नका.
आज तुम्ही बॅंक आणि शेतकरी कळवळ्याची भाषा बोलत आहात. स्वतःच्या राजकारणासाठी तुम्ही जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका. याउपरही तुम्हाला बोलायचे असेल तर मी पुन्हा प्रेस घेईन. कोणी किती आणि कसे पैसे घेतले हे पुढे आणेन. तुमचा खरा रंग ८८ अन्वये झालेल्या कारवाईच्या अहवालात दिसून येईल. सर्वांना अकलूजला बोलावायचं, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. कधी काळी विजयदादा असताना ऐकायचे. पण तुमच्या अशा वागणुकीमुळे तुमच्या शब्दाची किंमत आणि पत आता संपलेली आहे. आम्ही जिल्ह्यातील नेतेमंडळी बसून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्या प्रयत्न करू. लोकसभा, विधान परिषद निवडणुकीत कोणाचे काम केले, हे त्यांना विचारा. भाजपचा माणूस रोज भाजपसाठी काम करतो. पण, स्वार्थासाठी भाजपमध्ये राहून रात्री दुसऱ्याचं काम करायचं, अशी माणसं भाजपमध्ये नसल्याचेही आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.