Crime Sakal
पुणे

धक्कादायक! कर्ज घेतलेल्यास फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्यांनी केली मारहाण

फायनान्स कंपनीच्या वसुली एजन्सीच्या लोकांनी कर्ज घेतलेल्या नागरीकास डांबुन ठेवत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आला पुढे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फायनान्स कंपनीच्या (Finance Company) वसुली एजन्सीच्या (Recovery Agency) लोकांनी कर्ज घेतलेल्या नागरीकास डांबुन ठेवत मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेच्या धसक्‍याने नागरीकाची प्रकृती ढासळली. याप्रकरणी संबंधीत फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या एजन्सीच्या चालक, मालकासह सहा जणांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. हि घटना 26 जुनला स्वारगेट परिसरातील हॉटेल नटराज येथे घडली. (Loanwaiver the Recovery Company will Beating Crime)

याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका 52 वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन श्री एंटरप्रायझेस रिकव्हरी एजन्सीचा चालक, मालक व तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 जून रोजी दुपारी चार ते सायंकाळी सातच्या सुमारास नटराज हॉटेलजवळच्या रिकव्हरी एजन्सीजच्या कार्यालयात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. तर श्री एंटरप्रायझेस रिकव्हरी एजन्सीकडे संबंधीत फायनान्स कंपनीच्या कर्जाची वसूली करण्याचे काम आहे. त्यातूनच एजन्सीच्या लोकांनी फिर्यादीस कर्जवसुलीसाठी त्यांच्या कार्यालयामध्ये डांबुन ठेवले. त्यानंतर त्यांच्याकडून जास्त रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना शारिरीक व मानसिक त्रास दिला. हॉकीस्टीक, लोखंडी रॉडची भिती दाखवून पैसे न दिसल्यास हातपाय काढण्याची धमकी दिली. फिर्यादी हे तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना जीन्यात अडवून धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण केली. या प्रकारामुळे फिर्यादीची प्रकृती ढासळल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT