Local 
पुणे

लोहमार्ग दुरुस्तीसाठी चार लोकल रद्द

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या मार्गावर धावणाऱ्या दुपारच्या वेळेतील चार लोकल १७ ऑक्‍टोबरपर्यंत रद्द केल्या आहेत. पुण्याहून लोणावळ्याला दुपारी सव्वाबारा आणि एक वाजता जाणारी लोकल आणि लोणावळ्याहून दुपारी दोन आणि पावणेचार वाजता पुण्याला येणाऱ्या लोकलचा त्यात समावेश आहे. एक ऑक्‍टोबरपासून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यात सिग्नल यंत्रणा, रुळांची दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत. 

पुणे ते लोणावळा मार्गावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या लोहमार्गाची देखभाल करणे आवश्‍यक झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून वर्षातून दोन वेळा या मार्गाची देखभाल करण्यात येत असते. पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुपारच्या वेळेत कमी असते. त्यामुळे या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम या वेळेत करण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेने सुरू केलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दुपारच्या वेळेत पुणे ते लोणावळा दरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत नवं राजकीय समीकरण! छगन भुजबळ दिल्लीला जाणार; पुतण्याला मंत्रिपद मिळणार? मोठा राजकीय डाव

विमल खाऊन आला आणि बाथरूममध्ये ओकला, सुरज चव्हाणच्या नव्या घरात चाहत्याचा राडा; बायको संतापली

Latest Marathi News Update: जळगाव जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पाऊस

मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

Vladimir Putin: ''एकेकाळी अमेरिकेने मोदींवर निर्बंध आणले होते, मात्र आज...'', पुतिन यांनी करुन दिली भारताच्या ताकदीची जाणीव

SCROLL FOR NEXT