Local 
पुणे

लोकलचे वेळापत्रक रुळावर कधी?

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे-लोणावळादरम्यान लोकलची संख्या वाढवून गाड्यांच्या वेळेतील अंतर कमी करण्यासाठीचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली कामे लवकर करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकलची संख्या वाढविण्यात यावी आणि वेळेचे योग्य नियोजन करण्याची मागणी प्रवाशांकडून वेळोवेळी होत असली, तरी त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरातील लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलची कमी संख्या आणि त्यांच्या नियोजित वेळेत न धावण्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. गाडीला विलंब झाल्याने अनेक नोकरदारांना कार्यालयामध्ये पोचण्यास उशीर होतो. याविषयी प्रवासी आणि विविध संघटनांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावर प्रशासनाने अभ्यास करून निर्णय घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार अभ्यास पुढील आठवड्यात पूर्ण होत असून, लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.  

 पुणे-लोणावळा मार्गावर सध्या लोकलच्या जवळपास ४२ फेऱ्या सुरू आहेत. मात्र, त्यांच्या वेळेचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याच्या 
तक्रारी प्रवासी करतात. दररोज दुपारी जवळपास दोन ते तीन तास एकही लोकल नसल्याने प्रवाशांना स्टेशनवर तासन्‌तास थांबावे लागत आहे. तसेच, रात्री दहानंतर एकही गाडी नाही. दररोज प्रवाशांची संख्या वाढत असून, सध्याच्या गाड्यांची संख्या कमी पडत आहेत. महिलांसाठी एक डबा वाढविण्याची मागणीही करण्यात येत आहे. 

रेल्वे मार्गाचा विस्तार होणे आवश्‍यक
प्रवाशांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी. तसेच, लोणावळा-पुणे-दौंड या मार्गाचा विस्तारही करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.

लोकलच्या वेळेचे नियोजन आणि गाड्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात प्रशासनाचा अभ्यास पुढील आठ दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- कृष्षाथ पाटील, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक (वाणिज्य), रेल्वे

लोकल गाड्यांच्या वेळेचे नियोजन व्यवस्थित नसून दुपारी तीन तास एकही लोकल नसल्याने अडचणी येतात.  महिलांच्या डब्यामध्ये वाढ करण्यात यावी. रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यामध्ये सुरक्षारक्षक नसतात.
- चैताली गायकवाड, प्रवासी

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढवावी. सर्व गाड्या नियोजित वेळेत धावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाने गैरसोय दूर करावी.
- आकाश चिवटे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT