Rent a Car Sakal
पुणे

‘रेंट अ कार’च्या स्टेअरिंगला ‘लॉक’

चार मोटारींमध्ये २४ लाखांची गुंतवणूक केली. त्यासाठी कर्ज काढले. गेल्या ८-१० महिन्यांपासून धंदा अक्षरशः बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - चार मोटारींमध्ये २४ लाखांची गुंतवणूक (Investment) केली. त्यासाठी कर्ज (Loan) काढले. गेल्या ८-१० महिन्यांपासून धंदा अक्षरशः बसला आहे. गाड्या बंद असल्या तरी बॅंकांचे हप्ते (Bank Installment) सुरू आहेत. ड्रायव्हरलाही (Driver) सांभाळावे लागते, गाड्यांची देखभाल दुरुस्तीही (Repairing) आहेच. त्यामुळे जीव मेटाकुटीला आला आहे. सांगत होते, महंमदवाडीतील व्यावसायिक शिवाजी कांबळे. ही केवळ एका व्यावसायिकाची कैफियत नव्हे तर शहरातील वाहतूक व्यावसायिकांचे प्रातिनिधीक चित्र आहे. (Lock the steering wheel of a rental car)

शहरातील मोटारी भाड्याने देण्याचा मोठा व्यवसाय आहे. कारण पुण्याजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच उद्योगांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे मोटारी भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय गेल्यावर्षी मार्चपर्यंत जोमात होता. मात्र, कोरोनाची साथ फोफावली अन वाहतूक व्यवसाय विस्कळीत झाला. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार शहरात सुमारे ७५ हजार मोटारी प्रवाशांना भाडेतत्त्वावर दिल्या जातात. काहीजणांकडे दोन-चार तर, काही जणांकडे १०-१२ मोटारींचे विविध प्रकार आहेत. गेल्या वर्षीचा लॉकडॉउन ऑगस्टपर्यंत संपला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाजारपेठा खुल्या झाल्या. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक होऊ लागली. परंतु, यंदा पुन्हा गेल्या दोन वर्षांपासून निर्बंध आले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासीही आता मोटारी भाडेतत्वावर फारशा घेत नाही. मोटार वाहतूकदार अमोल आवारे यांनीही हीच खंत मांडली. ते म्हणाले, ‘आठवड्यातून दोन -तीन खेपाही मिळत नाही. मिळाल्या तरी बाहेरगावी जाण्यासाठीचा पास आम्हाला काढावा लागतो. त्यासाठी ड्रायव्हर लोकांनाही सांभाळावे लागते. गाड्यांचाही खर्च आहे. सगळंच अवघड झालं आहे.’

व्यावसायिक अडचणीत; कर्जाचे हप्ते डोईजड

  • प्रवासी वाहतुकीचे परमीट असलेल्या मोटारींची संख्या - सुमारे ७५,०००

  • कॅबची संख्या - सुमारे ३५,०००

धरली गावाकडची वाट

शहर आणि परिसरात सुमारे ३५ हजार कॅब कोरोनापूर्व काळात धावत होत्या. शहरातील कॅब चालकांमध्ये प्रामुख्याने लगतच्या जिल्ह्यांत राहणाऱ्या चालकांचा समावेश आहे. मात्र, लॉकडॉउन आणि विविध प्रकारचे निर्बंध लागू झाल्यावर बहुसंख्य कॅबचालकांनी सुरक्षितता म्हणून गावाकडे परतण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शहरात परवानगी असली, तरी कॅबची संख्या घटली आहे.

बॅंकांचे हप्ते, विमा, गाड्यांची देखभाल दुरुस्ती, सुटे भाग यांचा खर्च गाडी जागेवर असली तरी थांबू शकत नाही. तो करावाच लागतो. परिणामी वाहतूकदारांची परिस्थिती बिकट झाली आहे.

- प्रफुल्ल कोठारी, वाहतूकदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT