पुणे

लॉकडाउनला एक महिना पूर्ण; तरीही पुण्यात साडेसातशेहून अधिक रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्यात २४ मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला.या एक महिन्याच्या काळातही पुण्यातील बाधितांची संख्या साडेसातशेहून अधिक झाली आहे. यावरून या विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनबरोबरच ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारकडून २२ मार्च रोजी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. शुक्रवारी (ता. २४) त्यास एक महिना पूर्ण होत आहे. लॉकडाउन लागू होण्याआधी म्हणजे २४ मार्चपर्यंत राज्यात १०७ रुग्ण आढळले होते. त्यामध्ये सर्वाधिक संख्या मुंबई येथे होती. त्या खालोखाल पुण्यात १८, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२ रूग्ण आढळून आले होते. म्हणजे पंधरा दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून ३० रुग्ण आढळून आले होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

२४ मार्चनंतर लॉकडाउन लागू झाल्यानंतर एका महिन्यात कोरोनबाधितांची संख्या गुरुवार (ता. २२) पर्यंत पुणे शहरातील ७८३ पर्यंत वाढली आहे. यावरून ९ मार्च ते २४ मार्च दरम्यान रुग्णांची संखा विचारात घेतली, तर लॉकडाउनच्या एक महिन्यात ती तब्बल ७५५ वाढली असल्याचे दिसून आले आहे. यावरून केवळ लॉकडाउन नव्हे, तर त्याचबरोबरच ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा एकमेव पर्याय असल्याचे यावरून दिसून आले आहे. 

क्षेत्रीय कार्यालयनिहाय बाधितांची संख्या (२२ एप्रिलपर्यंत) 

भवानी पेठ ----- १७१ 
कसबा-विश्रामबाग वाडा ---- १११ 
ढोले पाटील-------११० 
येरवडा-कळस धानोरी------ ८२ 
घोले रस्ता -------------- ७७ 
धनकवडी-सहकारनगर--------४३ 
वानवडी- रामटेकडी-----३४ 
हडपसर-मुंढवा-----२६ 
बिबवेवाडी---------२४ 
नगररस्ता-वडगावशेरी--------१८ 
कोंढवा- येवलेवाडी--------१२ 
सिंहगड रस्ता--------९ 
वारजे-कर्वेनगर--------९ 
औंध-बाणेर -----------२ 
कोथरूड-कर्वेनगर-------१ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT