zone.jpgzone.jpg 
पुणे

पुणे : चौथ्या लाॅकडाउनमध्ये काय सुरू अन् काय बंद राहील? वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : रेड झोन आणि नाॅन रेड झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नाँन रेड झोनमध्ये ग्रिन आणि आॅरेंज झोनचा समावेश होतो. त्यादृष्टीने लाॅकडाऊन चारमध्ये काही सेवा, उद्योग, कार्यालये सुरू करण्यास सरकारने परवानगी दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

राज्यातील बहुतांश सर्व महापालिका रेड झोन आहेत. पण, जिल्ह्यांमध्ये मात्र, तुलनेने कोरोनाबाधीत रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे लाॅकडाउन चारमध्ये उद्योग, सेवा सुरू करताना रेड झोन आणि नाॅन रेड झोन अशा दोन प्रकारात वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार काय सुरू रहील आणि काय बंद राहील हे त्यांनी स्पष्ट केले. 
 
# रेड झोन
-    आजची स्थिती जशीच्या तशी राहिल. कारण, या भागात कंटेंटमेंट झोन मोठ्या प्रमाणात आहेत. 
-    या भागातील रुग्णांची संख्या बंद
-    रेस्टाँरंटमधून खाद्य पदार्थांची पार्सल सेवा सुरू 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नाँन रेड झोन
उद्योग
आँरेंज आणि ग्रिन झोनमधील इंडस्ट्री पूर्णतः खुल्या आहेत. त्या पूर्ववत सुरू होतील, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. 
बससेवा
- रेड झोन नसलेल्या भागात. म्हणजे आँरेंज आणि ग्रिन झोमधील जिल्ह्यांच्या अंतर्गत भागात बससेवा सुरू करण्याचे 
-शहरांमध्येही आॅरेंज आणि ग्रिन झोनमध्ये बस, रिक्षा, कारसेवा सोशल डिस्टस्टिंगची काळजी घेऊन सुरू करता येतील. उदा. चार चाकीमध्ये ड्रायव्हरसह तीन प्रवासी असतील. दुचाकीमध्ये एकच जण प्रवास करेल.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


-सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत दैनंदिन कामे करता येतील.

दुकाने, रेस्टाॅरंट, कार्यालये
- नाॅन रेड झोनमधील सार्वजनिक कार्यालये सुरू रहातील. 
- सर्व दुकाने, रेस्टाँरंट उघडायला परवानगी देण्यात आली आहे.

क्रिडांगणे
वैयक्तीक वापरासाठी मैदाने आणि क्रिडांगणे खुली करण्यात आली आहे. तेथे वैयक्तीक व्यायाम करता येईल. पण, तेथे गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

काय बंद राहील
-सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, 
-विमानांची उड्डाणे, रेल्वे, बस सेवा हे सर्वच झोनमध्ये बंद आहेत. 

कोरोनाबरोबर रहाताना...
-सोशल डिस्टंसिंग
- मास्क
- हात वारंवार स्वच्छ धुणे
- सॅनिटाझरचा वापरणे
- शिंकताना, खोकताना तोंडाला रुमाल धरणे
- कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर ठेवणे
- लग्न समारंभ किंवा अंत्यसंस्कार अशा वेळी गर्दी करू नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT