baramati 
पुणे

बारामतीतील कडक लॉकडाउनची १८ मेपर्यंत वाढली मुदत

दूध विक्री सकाळी सात ते नऊ या वेळेत सुरु राहणार असून इतर सर्व निर्बंध मागील आठवड्याप्रमाणेच कायम राहणार आहेत.

- मिलिंद संगई

बारामती ः आगामी सात दिवसांसाठी (ता. १८ मे मध्यरात्रीपर्यंत) बारामतीतील कडक लॉकडाउन वाढवणार असल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज केली. कडक लॉकडाउनची मुदत आज संपत होती, त्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत विविध पदाधिकारी, व्यापारी व इतर मान्यवरांची मते ऐकून घेतल्यानंतर दादासाहेब कांबळे यांनी कडक लॉकडाउन आठवड्यासाठी वाढवित असल्याचे जाहीर केले. फक्त किराणा घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र किराणा विक्रीच्या दुकानात ग्राहकांना किराणा सामानाची विक्री करता येणार नाही, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.

दूध विक्री सकाळी सात ते नऊ या वेळेत सुरु राहणार असून इतर सर्व निर्बंध मागील आठवड्याप्रमाणेच कायम राहणार आहेत. औषध दुकाने, रुग्णालय व कोविड पूरक सेवा सुरु राहणार आहेत. भाजीपाला व फळे विक्रीसही परवानगी नाकारण्यात आली आहे. बारामतीतील कोरोना पॉझिटीव्हीटीचा दर ४० टक्क्यांवरुन २७ टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याची माहिती देताना हा दर दहा टक्क्यांहून कमी होण्याची आवश्यकता कांबळे यांनी बोलून दाखवली. या प्रसंगी मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी बारामती नगरपालिका हद्दीतील तर गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी बारामती तालुका पंचायत समिती हद्दीतील परिस्थितीचा आढावा सादर केला.

गेल्या आठवड्यात बारामतीकरांनी कडक निर्बंध असतानाही नियम पाळून सहकार्य केले आहे. या मुळे रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. आगामी आठवडा कडक निर्बंध पाळले तर रुग्णवाढीचे प्रमाण निश्चित खाली येईल, असा विश्वास या प्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी व्यक्त केला. या संदर्भातील सविस्तर सूचना उपविभागीय अधिकारी काढणार असून ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द केली जाणार आहे. या बैठकीत विविध पदाधिका-यांनी आपली मते व्यक्त केली. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, तहसिलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack in Karad : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला; अधिराज पाटील जखमी, निवडणूक प्रचारातून घरी परतताना बिबट्याची झडप

ZP Elections 2026 Voting Live Update : परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानावरून गदारोळ; मतदानापासून रोखल्याचा आरोप

U19 World Cup: बॅटने इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीने मालिकावीर पुरस्कारानंतर शब्दांनी मनंही जिंकली, जाणून घ्या काय म्हणाला?

Pune News: राज्यातील शासकीय रुग्‍णालयांतील मोफत उपचार बंद; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क, अडीच वर्षांनंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न!

Pakistan Bomb Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या शिया मशिदीत नमाजवेळी आत्मघाती हल्ला; ७० जणांचा मृत्यू, १७० हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT