पुणे

लॉकडाउन, पॉर्न आणि सोशल मीडिया सुरक्षा...

रोहन न्यायाधीश

दचकलात का? गेल्या १० ते १२ दिवसांमध्ये पॉर्न बघत असल्याचे ई-मेल, ईमेल आयडी, इंस्टाग्राम आणि फेसबुक हॅक झाले आहे, असे ईमेल आले आहेत. अशा प्रकारचे ४० पेक्षा जास्त लोकांचे मेसेज आले. सगळयांना वेगळे वेगळे मेसेज न करता तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे...तीन ते चार मिनिटे लागतील पण नक्की वाचा आणि गरजू लोकांनाही पाठवा...

लोकांना पडलेले काही प्रश्न
1. मी तर घरातच आहे आणि बाहेरच्या नेटवर्कला (Unknown Network) कनेक्ट केले नाही?
2. असे कसे काय झाले असेल, मी कोणत्या नवीन मित्र, मैत्रिणीला ॲड नाही केले?
3. काय करू आता? फक्त ईमेल, फेसबुक, इंस्टाग्रामचा ॲक्सेस गेला असेल का? की सगळ्या मोबाइल चा ॲक्सेस गेला असेल?
4. सगळे बंद आहे आता मी मोबाईल वापरू का नको?
5. तुमच्याकडे मोबाईल चेक करायला कसा आणू किंवा काय करू आता? आणि अशाप्रकरचे बरेच काही प्रश्न...

सायबर हल्लेखोर आणि घुसखोरांच्या दृष्टीने सोशल मीडिया आणि त्यावरून मिळणारी माहिती खूप उपयुक्त ठरते. इंटरनेटचे काही वापरकर्ते लैंगिक आणि हिंसाचारी उद्देशाने लहान, तरूण मुलामुलींना आणि वृद्ध व्यक्तींना लक्ष्य करतात. ह्यांना 'ऑनलाइन प्रीडेटर्स' म्हणजे ऑनलाईन भक्षक असे नाव आहे. असे भक्षक लहानग्यांचे मतपरिवर्तन करणे, त्यांना लैंगिक बाबींत ओढणे, त्रास देणे, धमकावणे, त्यांच्या अकाउंटवरून त्यांच्या वयाला योग्य नसलेल्या गोष्टी करणे किंवा लोकांना फसवणे आणि अशा प्रकारचे अनेक गुन्हे केले जात आहेत.

आजकाल ईमेल आयडी, इंस्टाग्राम आणि फेसबुक हॅकबरोबरच तुम्ही पॉर्न किंवा प्रौढ सामग्री (adult content) बाबतचे मेल, येत ज्या मध्ये तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप डिव्हाइसमधून बघत असून, त्याचे व्हिडिओ क्लिप्स आम्ही वेबकॅम किंवा मोबाईल फ्रंट कॅमेराने रेकॉर्ड करून ठेवले आहे आणि जर २/३ दिवसांमध्ये आम्हाला पैसे नाही दिले, तर आम्ही तुमचे अकाउंट हॅक करून तुमचे ई-मेल कॉन्टॅक्टस घेतले आहेत, त्यावर पाठवू.

अशा पॉर्न बाबतचे मेल आले आहेत आणि काय करता येईल, अशी विचारणा केली जात आहे. हे फक्त तरुण मुला-मुलींनाच नव्हे, तर मोठ्या कंपन्यांना आणि कंपनीच्या डायरेक्टरलाही अशा प्रकारचे ई-मेल येत आहेत.

असे का होते...
त्याचे सोपे उत्तर भारतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक अँड्रॉइड मोबाईल वापरतात आणि त्या मध्ये तुम्हाला गूगल अकाउंट (Gmail) वारपल्याशिवाय तुमचा मोबाईल वापरणे शक्य नाही. त्यामुळे पॉर्न किंवा प्रौढ सामग्री पाहिले असल्यास किंवा पाहत असाल, तर तुम्ही अशा सायबर हल्लेखोर आणि घुसखोरांचे सोपे लक्ष्य बनता. आपण भक्षकांना प्रतिसाद देणे किंवा त्यांच्याशी चॅट करणे, संपर्क ठेवणे थांबवले की, अर्थातच त्यांच्याकडून आपल्या कुटुंबियांना किंवा मित्र-मैत्रिणींना त्रास देण्यासंबंधीच्या धमक्या येऊ लागतात.

ऑनलाइन भक्षकांना थोपवायचे कसे?
एखादी अपरिचित किंवा अल्पपरिचित व्यक्ती आपणांस काही कारण नसताना भेटवस्तू इ. देत असेल, प्रत्यक्ष भेटीचा आग्रह करीत असेल आणि अतिशय प्रेमळपणे वागत असेल, तर शंका येण्यास जागा आहे. कारण अशी व्यक्ती ऑनलाइन भक्षक असू शकते, त्यांना तुमची किंवा तुमच्या घरच्या लोकांची पर्सनल इन्फॉर्मशन देऊ नका. आजच्या काळामध्ये आपल्या
१. पब्लिक
२. पर्सनल
३. सोशल
असे तीन जीवन जगत असतो आणि पर्सनल आणि सोशल लाइफमध्ये खूप गोंधळ करून ठेवतो, ज्या मुळे असे प्रकारांना सामोरे जावे लागते.

अशी घ्या काळजी
1. सोशल मीडियासाठी Two Way Authentication चा वापर करा. पर्सनल मोबाइल नंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.
2. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
3. टोपणनावाचा वापर करा: युजरनेम म्हणून स्वतःचे खरे नाव वापरू नका, त्याऐवजी टोपणनावाचा उपयोग करा.
4. आपल्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका, कारण नेट वापरणाऱ्या प्रत्येकालाच ती दिसत असते.
5. प्रोफाइल सेट करताना सर्वांत मजबूत प्रायव्हसी सेटिंग वापरा. त्यामुळे फक्त तुमचे फ्रेंड्स तुमची माहिती पाहू शकतील.
6. ऑनलाइन चॅटिंगचे नियम स्वतःच ठरवा: चॅट वापरण्याचा कालावधी स्वतःच ठरवून तो पाळा.
7. अज्ञात (Unknown) इंटरनेट वापरू नका.

धमकी दिली गेल्यास हे करा...
1. घाबरू नका: शांत रहा, चॅट थांबवा व लॉगऑफ करा किंवा चॅटरूमच्या बाहेर पडा.
2. नाही म्हणण्यास घाबरू नका: भक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची आपली तयारी नसल्यास त्यांना न घाबरता तसे सांगा.
3. आलेल्या ईमेल आयडीचे फुल हेडर घेऊन ठेवावा आणि ब्लॉक करून ठेवावे.
4. आपल्या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या व तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जाईल असे भक्षकाला सांगा
5. कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तो नंतर गरज पडल्यास पुरावा म्हणून वापरता येईल.
6. लगेच लॉगऑफ करू नका: कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास लगेचच लॉगऑफ करू नका, पालकांना, सायबर एक्स्पर्ट यांच्याशी चर्चा करा. लाजू नका.

- रोहन न्यायाधीश, सायबर मानसशास्त्रज्ञ व सायबर क्राइम तज्ज्ञ
*Mobile: 08149128087*
*Email: rohan@dtfservice.com*
*Website: www.dtfservice.com*
*Website: www.cybercrimehelpline.com*

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chenab Rail Bridge: जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर धावली ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला यशस्वी चाचणीचा VIDEO

T20 World Cup 2024 Super 8 : बांगलादेशची थाटात सुपर-8 मध्ये एंट्री! रोमहर्षक सामन्यात नेपाळला पाजले पाणी; नेदरलँड्सचे स्वप्न भंगले

Ration Card KYC : बोगस धान्य वितरणाला बसणार आळा; रेशनकार्डधारकांना ई-केवायसी अनिवार्य

Marathwada Workers : पाच वर्षांत ६९ कामगारांनी गमावला जीव;मराठवाड्यातील कारखान्यांत अपघात

International Yoga Day 2024 : पहिल्यांदाच योगासनांचा सराव करताय? मग, ‘या’ सोप्या अन् फायदेशीर आसनांनी करा सुरूवात

SCROLL FOR NEXT