lockdown proposal divisional commissioner saurabh rao more restrictions 
पुणे

पुण्यात लॉकडाउन नाहीच; निर्बंध आणखी कडक होणार!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्यात असून, जिल्ह्यात लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, लॉकडाउन हा पर्याय होऊ शकत नाही, असे काही जणांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत प्रशासनाकडून लॉकडाउनचा प्रस्ताव दिला जाणार नाही. मात्र, आणखी कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आयोजित बैठकीत लॉकडाउनबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. या बैठकीस लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

लॉकडाऊन संदर्भातील पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लसीकरणाची गती वाढविणार
या संदर्भात विभागीय आयुक्त राव म्हणाले, देशात पुणे शहर आणि जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असून, ती वाढतच आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त निर्बंध लावता येतील का, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्ह्यात लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाउन हा पर्याय होऊ शकत नाही, असा राजकीय आणि सामाजिक मतप्रवाह आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आणखी कडक केल्याशिवाय पर्याय नाही. सध्या पुणे शहरासह जिल्ह्यात रोज सुमारे ४० हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लस घेतल्यानंतरही कोरोना बाधित झाल्यास त्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात. परंतु, गंभीर धोका निर्माण होत नाही. त्यामुळे ४५ वर्षे वयावरील नागरिकांनी लस घ्यावी. कोरोनाची दुसरी लाट ही आणखी सव्वा महिन्यांपर्यंत राहील, असा अंदाज आहे. या शंभर दिवसांच्या कालावधीत लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. दररोज सरासरी ६० हजार ते एक लाख व्यक्तींना लस देण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आल्यास एवढी त्रासदायक नसेल, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त राव यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT