Lockdown time is a problem for postal workers
Lockdown time is a problem for postal workers 
पुणे

लॉकडाऊनचा काळ पोस्टल कर्मचाऱ्यासाठी अडचणीचा

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : लॉकडाऊनच्या परिस्थितीत टपाल वाहतुकीची साधने बंद ठेवण्यात आल्यामुळे टपाल पोहोचवायचे कसे हा मोठा प्रश्न टपाल वाहकांसमोर उभा राहिला होता. याशिवाय कोरोनाची संसर्गजन्य साखळी गुणाकाराने वाढतच असल्याचे पाहून शहरातील टपाल वाहक (पोस्टमन) त्यांच्या घरातल्यांच्या सुरक्षेसाठी घरातून बाहेर पडण्यास कचरत आहे. तरीही अशा परिस्थितीत काही पोस्टमन व पोस्टल कर्मचारी आपल्या  जीवाशी खेळून आपली सेवा चालू ठेवण्याचे कर्तव्य पार पाडत आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील सोसायट्यांनी पोस्टमनला आत घेण्यास मनाई केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सरकारच्या नव्या आदेशानुसार टपाल कार्यालये सुरुच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोस्टमनची द्विधा मनस्थिती झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ मार्चला शहरासह राज्यातील टपाल कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र गुरुवारपासून कार्यालये पूर्ववत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बरीच पत्र ही बस आणि रेल्वेने शहरात आणली जातात मात्र लाॕकडाऊनमुळे बस आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या विषाणूच्या भीतीमुळे लोक टपाल कार्यालयात जाऊन पत्र टाकणे टाळत आहे. अशा नाजूक परिस्थितीत टपालाच्या संकलनावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

शहरातील बहुतांश पोस्टल विभागाचे कर्मचारी  उपनगरातील रहिवासी आहेत.  वाहने बंद असल्याने त्यांना कार्यालयात पोहचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय सरकारकडून आलेल्या आदेशानुसार अधिक काळजी म्हणून अंतर ठेवून काम सुरू ठेवण्याच्या सुचना पाळल्या जात आहेत. मात्र  हजार स्केअर फुटच्या कार्यालयात 20-30 कर्मचारी एकावेळी काम करतात. त्यांनी अंतर ठेवून काम कसे करायचे हा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. 

.पुणे शहरात एकूण ६२ टपाल वितरणाची कार्यालये व 30-35 बुकिंग ऑफिस आहेत.  शहरात साडे सहाशे पोस्टमन आणि पाचशेहून अधिक क्लार्क आहेत. एका कार्यालयासाठी ५०० रुपयाचा निधी सुरक्षा साहित्याच्या खरेदीसाठी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून या कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॕनिटायझरची खरेदी करणे अशक्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टपालच येत नसल्याने कार्यालय सुरू ठेवण्यात अर्थ नाही. टपाल घेऊन फिरताना पोस्टमनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोसाट्यांनी प्रवेश नाकारल्यामुळे पोस्टमनला टपाल परत घेऊन यावे लागत असल्याचे पोस्टमननी सांगितले.

बायोमॅट्रिकमुळे आधार सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत परंतु आयपीपीबी सुरू ठेवण्यास सांगितले आहे ज्या मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी बायोमेट्रिक घ्यावे लागते. जगभरात या विषाणूच्या संसर्गामुळे लोक मरत आहे, परंतु टपाल कार्यालयांना जीवाची पर्वा न करता काम करा असे सांगण्यात आले आहे. यावर तोडगा म्हणून ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन व अन्य सर्व पोस्टल युनियने  कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन, टपाल वाहकांची अडचण समजून पोस्टल कार्यालये बंद ठेवण्याची विनंतीपरपत्र सरकारला पाठविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT