Solar Power
Solar Power Sakal
पुणे

लॉकडाऊनमुळे पुण्यात सौरऊर्जेचा वापर दुप्पटीने वाढला

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - लॉकडाऊन (Lockdown) काळात बाजारपेठा, कार्यालये बंद असल्याने त्याचा थेट परिमाण वीज वापरावर (Electricity Use) झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून (Report) समोर आले आहेत. २०१८-१९ मध्ये व्यावसायिक ऊर्जेचा वापर १३२४.५३ दशलक्ष युनिट (मिलीयन युनिट) इतका झाला होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर २०१९-२० या वर्षात ७४३.५६ दशलक्ष युनिट (मिलीयन युनिट) इतका झाल्याने या काळात विजेची मागणी तब्बल ५० टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे समोर आले आहे. तर याच कालावधीत सौरऊर्जेचा वापर दुप्पटीने वाढला आहे. (Lockdown Use of Solar Energy in Pune has Doubled)

पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवाल २०२०-२१ आज (शुक्रवारी) मुख्यसभेत सादर करण्यात आला आहे. या अहवालात शहराचे तापमान, पर्जन्यमान, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, वृक्ष, पर्यावरण पूरक प्रकल्प, जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन याबाबत सद्यःस्थिती काय आहे हे नमूद केले आहे.

या अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे पुण्यात सर्वाधिक वापर हा घरगुती वापरासाठी होत असून, त्या खालोखाल व्यवसाय, उद्योग, महापालिकेचे प्रकल्प, शेती यासाठी होत असल्याचे नमूद केले आहे. कोरोनामुळे उद्योग व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक संकट ओढवले होते. पण याच काळात वीजेचा वापर मोठ्याप्रमाणात घटले होते. २०१-१९ मध्ये घरगुती विजेचा वापर हा २१९४ दशलक्ष युनिट इतका होता तो २०१९-२० मध्ये २०४४ दशलक्ष युनिट इतका झाला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात बसून होते, बहुतांचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले होते, तरीही वीज वापर सुमारे १५० दशलक्ष युनिटने कमी झाला आहे.

महापालिकेने गेल्या सहा वर्षाचा शहरातील एकूण वीज वापराची माहिती सादर केली असून, त्यामध्ये २०१४-१५ मध्ये ४४३५ दशलक्ष युनिट, २०१५-१६ मध्ये ४६२८ दशलक्ष युनिट, २०१६-१७ मध्ये ४५०१ दशलक्ष युनिट, २०१७-१८ मध्ये ५४४४ दशलक्ष युनिट २०१८०१९ मध्ये ५६०१ दशलक्ष युनिट वापर करण्यात आला होता, तर २०१९-२० मध्ये वीज ४४५२ दशलक्ष युनिट इतका झाला आहे. २०१५-१६ पेक्षाही २०१९-२० मध्ये वीज वापर कमी झाला असल्याचे समोर आले आहे.

सौरऊर्जेतून ३ कोटी युनीट वीज निर्मिती

लॉकडाऊच्या काळात विजेचा वापर कमी झालेला असला तरी याच काळात शहरात सौरऊर्जेचा वापर वाढला आहे. २०१८-१९ मध्ये २ हजार ६६७ सौरऊर्जा वापरणारे नागरिक होते, त्यांच्याकडून १.५३ कोटी युनीटची वीज निर्मिती झाली होती. तर २०१९-२० मध्ये ही सौरऊर्जा वापरणऱ्यांचची संख्या वाढून ३ हजार २११ झाली, यामाध्यमातून ३ कोटी २ लाख ९० हजार ३८७ युनीटची वीज निर्मीती झाली आहे. यामधून कार्बन उत्सर्जन कमी होण्यास हातभार लागत आहे.

‘लॉकडाऊन काळात बाजारपेठा, उद्योग बंद असल्याने वीजेचा वापर कमी झाला आहे. एकंदरीत या काळात नागरिकांनी पर्यावरण पूरक जिवन पद्धतीवर भर दिला होता. त्याचे प्रतिबिंब या पर्यावरण अहवालात दिसत आहे. शहरातील हवा, पाणी, जैवविविधता यामध्ये सुधारणा झाली आहे. भविष्यात देखील नागरिकांकडून यापद्धतीने जीवन जगल्यास शहरातील वातावरण चांगले राहील.’’

- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका

गेल्या दोन वर्षातील ऊर्जेचा वापर

ऊर्जा वापर प्रकार        २०१८-१९       - २०१९-२० (दशलक्ष युनिट)

घरगुती                        -   २१९४       - २०४४

व्यावसायिक                 -    १३२४         - ७४३

उद्योग                         - १४६०           - ११४६

शेती                           - २०               - १४

महापालिका                  - २८१              - २५८

इतर                           - ३२०              - २४५

एकूण                         - ५६०१             - ४४५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT