Hotel_Lodge
Hotel_Lodge 
पुणे

अतिथी तुम कब आओगे? हॉटेल, लॉज चालकांना ग्राहकांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉज, रूम असलेले हॉटेल आणि गेस्ट हाउस सुरू करण्याची परवानगी देऊन महापालिकेने या व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. मात्र परवानगी मिळाली असली तरी या व्यावसायिकांची ग्राहक येण्याची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. व्यवसाय सुरू झाल्यापासून अद्याप काही लॉजमध्ये एक देखील ग्राहक फिरकला नाही.

गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत शहरातील निवासी हॉटेल आणि लॉज बुधवारपासून (ता.५) सुरू झाले आहेत. त्यानुसार महापालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. मात्र कामानिमित्त शहरात येणाऱ्या आणि त्यात हॉटेलमध्ये राहणाऱ्या नोकरदारांची संख्या सध्या अत्यल्प आहे. तर परराज्यातून शहरात येताना आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच प्रवासादरम्यान किंवा येथे आल्यानंतर कोरोनाची भीती यामुळे व्यवसायिक ये-जा देखील थंडावली आहेत. त्याचा परिणाम म्हनुन व्यवसायाबाबत येणारे ग्राहकही थांबले आहेत.

त्यामुळे निवासी हॉटेल व लॉजसारखे व्यवसाय सुरू झाले असले तरी त्यातील अनेकांना ग्राहक सेवेची संधी मिळालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आपल्याकडे राहायला येणारच नाही, असा अंदाज बांधत काही व्यवसायिकांनी आपले लॉज सुरूच केलेले नाही. लॉज सुरू केला आणि पुरेसे ग्राहक आले नाही तर देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील परवडणार नाही. त्यामुळे अजून काही दिवस व्यवसाय बंद ठेवलेला बरा, अशी अनेकांची भावना आहे.

पार्सललाही प्रतिसाद कमीच : 
केवळ जेवण पुरवणारे हॉटेल सुरू करण्यास सध्या परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र पार्सल सेवा देण्याची सूट त्यांना आहे. त्यानुसार शहरातील १० टक्के हॉटेल पार्सलची सुविधा पुरवत आहे. मात्र त्यांना मिळणारा प्रतिसादही खूपच कमी आहे, असे हॉटेल 'गणराज'चे दयानंद मूल्या यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT