पुणे

कोणाच्या नजरेत न येण्याची खबरदारी

CD

पुणे, ता. २४ ः केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा प्रियकर चेतन चौधरी अगोदरच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. दोघांनी केतनच्या खुनाचा अचूक कट रचला होता. सुरवातीपासून दोघे पोलिस आणि इतर कोणाच्या नजरेत येऊ नयेत, याची खबरदारी घेत होते.
लोहगडावर जाण्यापूर्वी चेतनने त्याचा मोबाईल दुकानात ठेवला होता. त्याचे इंटरनेट बंद केले. कामगाराचा मोबाईल घेऊन तो लोहगडावर आला होता. किल्ल्यावर पोहचल्यानंतर सुरक्षा रक्षक, तसेच इतरांच्या नजरेत आपण येऊ नये म्हणून तो काळजी घेत होता. त्याने तोंड बांधून अंगावर हुडी परिधान केली होती. पाठीला बॅग, बर्मुडा, पायात स्पोर्ट शूज, तर कानाला मोठा हेडफोन लावला होता. आपण ट्रेकिंग व व्यायामासाठी येथे आल्याचे त्याने भासवले.
सिया आणि केतन किल्ल्यावर पोचताच चेतन त्यांच्या पाठीमागून वर आला. संधी मिळताच सिया आणि चेतन या दोघांनी केतनला कड्यावरून खाली दरीत ढकलून दिले. सिया हिने आरडा-ओरडा करत सुरक्षा रक्षकाला केतन पडल्याचे सांगितले. सियाने आई पूजा गोयल हिला केतन किल्ल्यावरून खाली पडल्याचे सांगितले. त्यानंतर केतनच्या कुटुंबीयांनी लोहगडाकडे धाव घेतली.

चेतनकडून व्यायामाचे कारण
सिया आणि केतन हे दोघे १८ जूनला सकाळी साडेआठला मोटारीने लोहगडाकडे निघाले. ते येणार असल्याची माहिती चेतनला होती. त्यामुळे दोघे येण्यापूर्वीच तो किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जाऊन बसला. हे दोघे किल्ल्याकडे निघाले असता, चेतन त्यांच्या पाठीमागून आला. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी २५ रुपयांचे शुल्क भरून तिकीट घ्यावे लागते. तिकीट न घेतल्याने सुरक्षा रक्षकाने चेतनला हटकले होते. यावेळी तो म्हणाला की, मी व्यायाम करण्यासाठी आलो आहे. परत खाली येताना पैसे देतो. पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी त्याने ही शक्कल लढविली असल्याचा अंदाज आहे. मात्र तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Ketan Agarwal Case : चेतनच्या कृत्यामुळे कुटुंब धास्तावले; फ्लॅटला कुलूप लावून रातोरात झाले पसार!

US-Iran Conflict: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणविरोधातील लष्करी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये मंजूर

Jamun Sharbat: पावसाळ्यातला थकवा दूर करतं जांभळाचं हे खास सरबत; एकदा प्याल तर पुन्हा पुन्हा मागाल

Baramati AI Farming: बारामतीचा आवाज थेट संयुक्त राष्ट्रांपर्यंत! शेतकऱ्यांसाठी विकसित ‘एआय’ संशोधनाची रोममधील जागतिक परिषदेसाठी निवड

SCROLL FOR NEXT