Lohgaon Municipal Bus Number Reduction Hits Passengers Neglect of administration 
पुणे

लोहगाव-मनपा बस संख्या कमी केल्याचा प्रवाशांना फटका; प्रशासनाचे दुर्लक्ष

बसेसच्या फेऱ्या वाढवाव्याची प्रवाशांची मागणी

अनुराधा धावडे

पुणे - कोरोना महामारीचे निर्बंध हटवल्यानंतर शहरातील वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली. तरीही शहरातील अनेक मार्गांवरील बसेस पूर्वीच्या प्रमाणात वाढविण्यात आलेल्या नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून लोहगाव-मनपा आणि मनपा-लोहगाव, आळंदी बस क्रमांक 119 या मार्गावरील बस कमी करण्यात आल्या आहेत. बसेस अल्याने प्रचंड हाल होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. त्यामुळे या मार्गावरील बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कोरोनानंतर जून महिन्यापासून शाळा कॉलेज पूर्ववत सुरु झाले. कामावर येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही वाढली. पण या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या पाहूनही त्या प्रमाणात बस वाढवण्यात आल्या नाहीत. सकाळच्या वेळी विद्यार्थी- कामावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकदा बस लोहगाव मध्येच फुल्ल झाल्याने पुढच्या थांब्यांवर प्रवाशांना बसमध्ये चढायलाही जागा राहत नाही. बसायला जागा मिळाली नाही की अनेकदा प्रवासी बस वाहकाशी, चालकाशी हुज्जत घालतात. लोहगावमध्येच बस फुल्ल झाल्याने पुढे जकातनाका, धानोरी गाव, परांडेनगर, साठेवास्ती, भैरवनगर, भरतढाबा या थांब्यांवर असलेल्या प्रवाशांना बसमध्ये चढायलाही जागा राहत नाही.

कोरोनापूर्वी या मार्गावर १२ बसेसच्या फेऱ्या व्हायच्या, पण कोरोनानंतर आता या मार्गावर केवळ नऊ बसेसच्या फेऱ्या होतात. यातल्या सात लोहगाववरून सुटतात. तर दोन खंडोबा माळवरून सुटतात. लोहगाव येथून बसेसच्या फेऱ्या कमी झाल्याने बससाठी चाळीस- पन्नास मिनिटे वाट बघावी लागते. त्यामुळे शाळा-कॉलेज आणि कामावर जाणाऱ्याचा खोळंबा होतो. या मार्गावरील बस कमी असल्याने अनेकदा पुढील थांब्यांवरील प्रवाशांना बस पकडण्यासाठी विश्रांतवाडी च्या थांब्यांवर जावे लागते.

त्यातच भर म्हणजे, बसच्या फलकांवरील नावेही अस्पष्ट झाली आहेत. अनेकदा ज्येष्ठ नागरिक प्रवास करताना फलकांवरील अस्पष्ट नावांमुळे चुकीच्या बसमध्ये चढल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात महापालिका येथील बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानक आहे. मात्र या ठिकाणी बस स्थानकावर पाषाण आणि सुसगावचे फलक लावण्यात आलेले नाहीत. प्रवाशांना थांबण्यासाठी शेडची व्यवस्थाही नसल्याने पाषाण सुसगाव ला जाणारे प्रवासी चुकीच्या ठिकाणी थांबतात. याठिकाणी पाषाण आणि सुसगावसाठी थांब्यांचे फलक आणि शेड ची व्यवस्था करावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.

भैरवनगर बस थांब्यावरील प्रवासी वैशाली गायकवाड म्हणतात, मी गेल्या ६-७ वर्षांपासून कामावर जाते, कोरोनाच्या आधी १५ मिनिटांनी बस असायच्या पण आता ४०-५० मिनिटे बससाठी वाट बाघावी लागते. त्यामुळे बस सुटली तर पुढच्या बससाठी चाळीस-पन्नास मिनिटे थांबवं लागतं. मी महिन्याचा पास एकदाच काढते. पण बस सुटली किंवा आलीच नाही तर अनेकदा मला रिक्षाने जावं लागत. मग पास काढून उपयोग काय? कधीकधी बसमध्ये चढायलाही जागा नसते. कामावर पोहचायला वेळ झाला तर तिथेही ओरडा बसतो.

माझं कॉलेज साडेसातचं असतं. पण बससाठी १ तास आधीच घरातून निघावं लागतं, त्यात बस मिस झाली की खूप वेळाने बस येते, तोपर्यंत 1 लेक्चर होऊन गेलेलं असतं. किमान विद्यार्थ्यांसाठी तरी या मार्गावरुन बसच्या फेऱ्या वाढवाव्यात.

- स्नेहा पुजारी.

जून महिन्यात शाळा-कॉलेज सुरु झाले. आम्ही बसने प्रवास करतो. आठ वाजता कॉलेजमध्ये पोहचायचं असेल तर आम्ही ७ च्या आधीच बस स्टॉपवर येऊन थांबतो. बससाठी कधी-कधी अर्धा तास वाट पाहूनही बस मिळत नाही. ८-१० किलोमीटर साठी आम्हाला तासंनतास बसची वाट पाहावी लागते.

- ज्योती दोडमनी.

लोहगाव-मनपाच्या बस कमी केलेल्या नाही. या मार्गावर १०-१२ बस होत्या, त्यातल्या दोन खंडोबा माळ, धानोरीच्या आहेत, इतर दोन फाईव्ह-नाईन या मार्गावरुन जातात आणि उरलेल्या ८ लोहगावच्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार आम्ही येत्या एक-दीड महिन्यात या मार्गावर बसेस वाढवू.

- दत्तात्रय झेंडे, वाहतुक व्यवस्थापक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

R. Madhvan Parenting Tips: "मुलांना मोकळा वेळ देऊ नका!" आर. माधवनने दिल्या यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलं घडवण्याच्या टिप्स

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Irregular Sleep Schedules: ८ तास झोपल्यानंतरही बिघडू शकतं का आरोग्य? जाणून घ्या झोपेचं योग्य वेळापत्रक का गरजेचं

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

SCROLL FOR NEXT