पुणे

लोहगावात मंगळसूत्र हिसकाविण्याच्या घटनांत वाढ

CD

लोहगाव, ता. २१ : लोहगाव आणि वाघोली परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारी (ता.१९) दुपारी दीडच्या सुमारास दादाची वस्ती येथील दत्त मंदिराजवळ दीपाली तनपुरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले होते.
दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (ता.२०) वाघोली रस्त्यावरील सातव वस्ती या ठिकाणी मनीषा खरमाटे या पायी जात असताना मागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. दरम्यान, त्याच दिवशी लोहगावमधील माळवाडी वस्ती परिसरात दुचाकीवरील चोरांनी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला.
माळवाडी आणि सातव वस्ती घटनेतील दोनही चोर एकच असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. दुचाकीवरील या चोरट्यांनी लोहगाव आणि वाघोली परिसरात उच्छाद मांडला असून पोलिसांना आव्हान देत भर दुपारी पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष करत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून लवकरात-लवकर या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात लोहगाव आणि वाघोली पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Ramadan 2026: रमजानमध्ये इबादत, शांती आणि सवाबाचा अनुभव घ्यायचा आहे? भारतातील 'या' मशिदींना नक्की भेट द्या

Latest Marathi News Live Update : काही तपासण्या करण्यासाठी शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलला आणलंय : सुप्रिया सुळे

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT