लोहगाव येथे रायबा तालीम ट्रस्टतर्फे जंगी निकाली कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला होता. या कुस्ती स्पर्धेस परिसरातील कुस्तीप्रेमी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या स्पर्धेतील अंतिम लढत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणी पृथ्वीराज पाटील यांच्यात झाली. जवळपास एक तास चाललेल्या या थरारक लढतीने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली.
अखेरीस दोन्ही पहिलवानांनी खेळभावनेचा आदर्श ठेवत नाणेफेकीद्वारे या दीर्घ लढतीचा निकाल लावण्याचा निर्णय घेतला. यात पृथ्वीराज पाटील याने विजय मिळवत प्रतिष्ठेचा ‘संत तुकाराम महाराज केसरी’ हा किताब पटकाविला. या कुस्तीस चांदीची गदा आणि रोख दोन लाख रुपये असे पारितोषिक माजी उपसरपंच प्रीतम खांदवे आणि रायबा तालीम ट्रस्टचे अध्यक्ष पै. सोमनाथ मोझे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कुस्तीचे पंच म्हणून वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी काम पाहिले.
या प्रसंगी माजी उपसरपंच सोमनाथ खांदवे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, रामदास दाभाडे, अनिल सातव, नगरसेविका रेखा टिंगरे, महेंद्र भाडळे, पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, दीपक मोझे, सचिन खांदवे आदी उपस्थित होते.
लोहगाव ः स्पर्धेतील अंतिम लढत लावताना मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.