पुणे

विरोधकांशी संवादाचा सातत्याने प्रयत्न ः रिजिजू

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.१९ ः लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकावर सरकारने विरोधकांशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे  केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. 
खर्गे यांनी गेल्या शुक्रवारी (ता. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौथ्यांदा पत्र लिहून मतदारसंघ फेररचनेविषयीच्या  प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली होती.  ‘‘सरकारने काँग्रेसचा पाठिंबा आणि सहकार्य मागण्यासाठी १६ मार्च, २६ मार्च आणि १२ एप्रिल २०२६ रोजी पत्रे पाठवली होती. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान मी स्वतः खर्गे यांच्याशी चर्चा केली आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली, याचे स्मरण रिजिजू यांनी या पत्राद्वारे करून दिले आहे. 
‘‘काँग्रेसने चर्चेसाठी वेळ किंवा तारखा दिल्या नाहीत. त्यामुळे सरकारला द्रमुक. समाजवादी पक्ष, बिजू जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सांरख्या  पक्षांशी संपर्क साधावा लागला. सरकारने याआधीच चर्चेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले असताना पुन्हा तीच- तीच मागणी का केली जात आहे, ’’असा सवाल रिजिजू यांनी केला आहे. काँग्रेसने संसदेच्या कामकाजात आणि महत्त्वाच्या विधेयकांसाठी रचनात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT