Sonam Wangchuk sakal
पुणे

वांगचुक यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

मंगळवारी पुरस्काराचे वितरण; महाराष्ट्र विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने मंगळवारी (ता.१२) सायंकाळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मादी केंद्रीय गृहमंत्री आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार रजनी पाटील उपस्थित असणार आहे. यावेळी ट्रस्टच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवा पिढीची केलेली घडण, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा हिरीरिने पुरस्कार व प्रसार, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक बदलासाठी सन २०२०च्या पुरस्कारासाठी ही निवड करण्यात आली आहे, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वांगचुक लेह जवळ सेकमॉल पर्यायी शाळा केंद्र संपूर्ण जगाचे लक्ष वेधणार ठरले आहे. १९८८ मध्ये त्यांनी लडाखच्या सरकारी शाळांमधील व्यवस्थेत गुणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने स्टुंडट्स एज्युकेशनल ॲण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख ही चळवळ सुरू केली होती. सरकार, ग्रामिण समुदाय आणि नागरी समाज या तिघांच्या समन्वयातून ग्राम शिक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या. पाठ्यपुस्तकाच्या पुनर्लेखनानंतर आलेल्या बदलाने दहावी परीक्षेतील उत्तीर्णांचे अवघ्या सात वर्षांत पाच टक्यांवरून ५५ टक्यांवर पोहचले होते. आता हे प्रमाण ७५ टक्के इतके आहे. वांगचुक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT