पिंपरी-चिंचवड - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे विरोधक भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याशी झालेल्या भेटीत हस्तांदोलन करीत दिलखुलास पोजही दिली.
पिंपरी-चिंचवड - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे विरोधक भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याशी झालेल्या भेटीत हस्तांदोलन करीत दिलखुलास पोजही दिली. 
पुणे

Loksabha 2019 : मावळात भाजपची राष्ट्रवादीला साथ?

सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी जगताप यंदा इच्छुक होते. मात्र युती झाल्यामुळे त्यांची निराशा झाली. तरीही जागावाटपात हा मतदारसंघ भाजपला मिळावा किंवा शिवसेनेने उमेदवार बदलावा, अशी मागणी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत रेटली होती.

त्यामध्येही अपयश आल्याने जगताप यांची भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, बारणेंचा पराभव झाल्यास भाजपला जबाबदार धरू नये, असे जाहीरपणे त्यांनी सांगितले होते. गेल्या आठवड्यात मात्र ‘युतीचा धर्म पाळू’ असे अगदी त्रोटक बोलले होते. तरीही ते बारणे यांना कितपत मदत करतील, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. यालाचा पुष्टी देणारी घटना पिंपळे गुरवमध्ये शनिवारी शिवजयंतीनिमित्ताने घडली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्याशी झालेल्या भेटीत हस्तांदोलन करीत दिलखुलास पोजही दिली. यामुळे युतीच्या रामायणात भाजपच्या ‘लक्ष्मणा’ची भूमिका काय असणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT