Leader 
पुणे

Loksabha 2019 : दिग्गज प्रचारक मैदानात

सकाळवृत्तसेवा

शरद पवार, फडणवीस, आंबेडकर, आदित्य ठाकरे, ओवेसी यांच्या सभा
पिंपरी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यामध्ये होणारी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 

मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात बारणे यांच्या प्रचारासाठी २४ एप्रिल रोजी आदित्य ठाकरे यांची, तर २५ एप्रिलला उद्धव ठाकरे यांच्या तोफा चिंचवडमध्ये धडाडणार आहेत. पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच शेकापचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची सभा या निवडणुकीचे आकर्षण ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार (ता. १२ ) अखेरचा दिवस आहे. 

भाजपचे केंद्रीय मंत्री प्रचाराला
केंद्रातील मंत्री प्रचारासाठी मावळ मतदारसंघात येणार आहेत. सध्या केंद्रातील मंत्री या भागातील भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यग्र आहेत. १९ ते २७ एप्रिलदरम्यान ते मावळ मतदारसंघात प्रचारासाठी येणार असून, सभांबरोबरच प्रचार फेऱ्या, मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पनवेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे नियोजन करण्यात येणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यामध्ये मनोमीलन झाल्यामुळे शहरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बारणे यांच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत.  पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी शनिवारी (ता. १३) साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात शरद पवार यांच्या सभा शहरात होणार आहेत. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे शहरात आयोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT