Speaker
Speaker 
पुणे

Loksabha 2019 : प्रचारगीतांचा आवाज

सकाळवृत्तसेवा

पुणे - जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत काही क्षणांत पोचायचे असेल, तर विविध सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. निवडणूक काळात या माध्यमांचा वापर करून उमेदवार मतदारांपर्यंत पोचतात. मात्र, तरीही प्रचारगीते आणि विकासकामांची माहिती देणारे ऑडिओ बनविण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.    

विविध पक्षांच्या पहिल्या टप्प्यातील याद्या जाहीर झाल्या आहेत. तिकीट मिळालेल्या उमेदवारांची प्रचाराची लगबग सुरू आहे. त्यासाठी नवनवीन युक्‍त्या वापरल्या जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारगीतांवर भर असतो. सध्या गाजत असलेल्या मराठी गाण्यांच्या चालींद्वारे प्रचारगीतांना उमेदवारांची पसंती आहे. प्रसिद्ध गाण्यांच्या चालींवर गाणे बसविल्यास किंवा चांगला संदेश व आश्‍वासने देणारे एखादी ऑडिओ क्‍लिफ असेल तर ती मतदारांना आकर्षित करते. त्यामुळे उमेदवारांची मागणी अशा गीतांना असते. प्रचारगीतांसाठी राष्ट्रीय पक्षांकडून मोठा खर्च करण्यात येतो. त्यासाठी गायक, लेखकदेखील निवडण्यात आले आहेत. प्रचारगीतांतील मजकूर काय असावा, यावरही भर दिला जात आहे.

नागरिकांपर्यंत जाणाऱ्या बाबी या सोप्या व नेमकेपणाने मांडलेल्या असाव्यात, अशी अपेक्षा उमेदवारांची असते. स्थानिक पक्षही या सर्वांत मागे नाहीत. पालिका आणि विधानसभा निवडणुकीवेळी अशी गाणी मोठ्या प्रमाणात बनविण्यात आली होती, अशी माहिती स्टुडिओ व्यावसायिक मिलिंद जोशी यांनी दिली. 

उडत्या चालींवरील गाणी नागरिकांच्या लक्षात राहतात. त्यामुळे त्या चालींचा आधार घेतला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मला आमदार झाल्यासारखे वाटतेय’, ‘माऊली माऊली...’ अशी गीते खूप चालली. त्यासाठी जास्त काही खर्च येत नाही. अनेकांना प्रचारगीतांमुळे रोजगारही मिळतो.
- राहुल झेंडे, व्हिडिओ एडिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT