BJP and Congress
BJP and Congress 
पुणे

Loksabha 2019 : पुण्यात कॉंग्रेसनंतरच भाजप खोलणार पत्ता

सकाळवृत्तसेवा

पुणे - बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्राचारात आघाडी घेतली असून, मावळ आणि शिरूरमधील शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. परंतु, भाजपने पुणे आणि बारामतीचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. पुण्यात कॉंग्रेसचा उमेदवार ठरल्यानंतरच उमेदवार घोषित करून पहिल्याच फेरीत कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याचा भाजपचा डाव आहे. परिणामी, भाजप आणि कॉंग्रेसचा उमेदवार कोण, याची उत्सुकता वाढली आहे.

इच्छुकांमध्ये रस्खीखेच वाढल्याने भाजपने आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्तात ठेवल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तर, पक्षातील गटातटामुळे कॉंग्रेस आपला उमेदवार जाहीर करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ नेत्यांची लवकरच बैठक होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे भाजप आणि कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे, मावळमधून पार्थ पवार; तर शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरविले आहे. मावळ आणि शिरूरमधून शिवसेनेचे खासदार अनुक्रमे श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली उमेदवारी गृहीत धरून प्रचाराला सुरवात केली आहे. त्याचवेळी या दोन्ही मतदारसंघांतील पार्थ पवार आणि डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाल्हेकरवाडी आणि चाकण येथे सभा घेतल्या. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांची भेट घेऊन पवार यांनी त्यांची नाराजी दूर करीत पार्थसाठी काम करण्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.

पुण्यातील उमेदवार जाहीर होत नसल्याने भाजपमधील इच्छुक अस्वस्थ असून, बारामतीची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी अर्धा डझन इच्छुकांनी दिल्लीदरबारी "लॉबिंग' सुरू केले आहे. त्यामुळे पुण्यापाठोपाठ बारामतीच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT