Raj Thackeray, Nitin gadkari and Devendra Fadnavis sakal
पुणे

Loksabha Election 2024 : राज ठाकरे, नितीन गडकरी, फडणवीसांच्या पुण्यात सभा

पुणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना महायुतीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना महायुतीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पुण्यात सभा घेणार आहेत. तसेच उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीरनाम्याचे गुरुवारी (ता. ९) प्रकाशन होणार आहे.

भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, शहर उपाध्यक्ष श्याम देशपांडे, प्रशांत हरसुले, लहूजी क्रांती सेनेचे नितीन वायदंडे उपस्थित होते.

८ मे ते ११ मे या कालावधीत पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत विविध नेत्यांच्या सभा होणार आहेत. राज ठाकरे यांची १० मे रोजी टिळक चौकात सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तीन सभा होणार आहेत.

नितीन गडकरी यांची कोथरूडमध्ये सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ‘नमो संवाद मेळावे’ घेणार आहेत. चित्रा वाघ मार्गदर्शन करणार आहेत, असे या वेळी पांडे यांनी सांगितले.

एक लाख तरुणांशी संवाद

लोकसभा निवडणुकीत तरुणांचे काय मुद्दे आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून संवाद साधला जात आहे. आत्तापर्यंत ७१ हजार जणांशी संवाद साधला. १४ प्रश्‍नांची उत्तरे त्यांच्याकडून घेतली आहेत. यात ४५ टक्के तरुणी आहेत. आम्ही एक लाख तरुणांसबोत संवाद साधणार आहोत. नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक व युवकांबद्दलच्या धोरणामुळे तरुणांचे भाजपलाच मतदान होईल, असा विश्‍वास पांडे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT