Loksabha Election 2024 esakal
पुणे

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

निवडणुकांत मताच्या आमिषाने दिलेली आश्वासने आणि राज्य व केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना या दोन्ही बाबी ऐकायला व वाचायला खूप छान वाटतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - निवडणुकांत मताच्या आमिषाने दिलेली आश्वासने आणि राज्य व केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना या दोन्ही बाबी ऐकायला व वाचायला खूप छान वाटतात. मात्र जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता होत नाही. तर सरकारच्या योजनांची अंमलबजावणी झालेली नाही, अशी परिस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच आहे, अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना खूष करून त्यांची मते मिळवण्यासाठी आत्तापर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये त्यांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र त्यांची पुर्तता होत नाही. यावेळच्या जाहीरनाम्यांत ज्येष्ठांसाठी ठोस आश्वासने देखील दिसत नाहीत. ज्येष्ठांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत.

मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांचे प्रश्न जैसे थे आहेत. याचा गांभीर्याने विचार करायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या ‘जनसेवा फाउंडेशन’ने व्यक्त केली आहे.

ज्येष्ठांना मदत आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलार्इन सुरू केली आहे. त्यातील राज्याच्या हेल्पलार्इन प्रतिसाद आहे. मात्र केंद्राची हेल्पलार्इन गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. सरकार ज्येष्ठांच्या प्रश्नांबाबत किती गंभीर आहे, हे त्यातून दिसते. तशीच परिस्थिती जाहीरनाम्याच्या बाबतीत देखील आहे. ज्येष्ठांच्या प्रश्न समाजाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

- पांडुरंग खाडे, ज्येष्ठ नागरिक

देशात १६ कोटी ज्येष्ठ नागरिक असून एकूण मतदारांच्या संख्येत त्यांचा वाटा मोठा आहे. ७० टक्के ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागात राहतात. त्यांच्यापर्यंत अनेक बाबी पोचतच नाही. दारिद्र रेषेखाली असलेल्या ज्येष्ठांना दरमहा किमान तीन हजार रुपये मिळावे, अशी आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. जाहीरनामे प्रसिद्ध होतात आणि निवडणुका झाल्या की पुन्हा ज्येष्ठांचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होते.

- डॉ. विनोद शहा, अध्यक्ष, जनसेवा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

SCROLL FOR NEXT