Central Election Commission of India
Central Election Commission of India sakal
पुणे

Loksabha Election : पुण्यात होणार ५७ व्या दिवशी मतदान

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा शनिवारी (ता. १६) केली. जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात ५० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर मतदान होणार आहे. बारामतीत ७ मे म्हणजे ५१ व्या दिवशी तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये १३ मे रोजी म्हणजे तब्बल ५७ व्या दिवशी मतदान होईल. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास दोन महिने प्रचाराची रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची आचारसंहिता कधी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशात लक्षवेधी ठरणार आहे.

या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यापूर्वीच येथे राजकीय पक्षांनी बैठका, मेळावे, मतदान केंद्रनिहाय यंत्रणा लावण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचार सुरु केला आहे. पण या दोन्ही मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.

पण काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. मावळमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील एकूण स्थिती पाहता बारामतीमध्ये सुळे यांना प्रचारासाठी ४९ दिवस मिळणार असून, तेथे ५१ व्या दिवशी मतदान आहे. तर मोहोळ, आणि कोल्हे यांना ५५ दिवस प्रचारासाठी मिळालेले आहेत. तेथे ५७ व्या दिवशी मतदान आहे.

वेळ मिळणार पण कस लागणार

पुणे जिल्ह्यातील पुणे वगळता बारामती, शिरूर, मावळ हे तिन्ही मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या मोठे आहेत. सर्व भागात पोचताना उमेदवारांची दमछाक होत असल्याचा यापूर्वीच्या निवडणुकांमधील अनुभव आहे. मात्र यंदा पुणे जिल्ह्याचा तिसऱ्या आणि चौथ्या टप्‍प्यात मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी मोठा कालावधी मिळाला आहे.

पुणे लोकसभेच्या उमेदवारांनाही या मोठ्या कालावधीचा फायदा होणार आहे. पण भर उन्हाळ्यात प्रचार करताना कार्यकर्त्यांना सांभाळता व खर्च करताना उमेदवारांचा कस लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT