Ravindra Dhangekar sakal
पुणे

Ravidnar Dhangekar : स्मार्ट सिटी प्रकल्प मार्गी लावणार

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात धंगेकर यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला गेला. पण पुणेकरांच्या पदरी निराशाच आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘केंद्र सरकारने गुंडाळलेला पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प आम्ही मार्गी लावू आणि पुणेकरांना आशा लावण्यात आलेल्या प्रकल्पांची पूर्तता करू’, अशी ग्वाही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली.

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात धंगेकर यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला गेला. पण पुणेकरांच्या पदरी निराशाच आली आहे. हा प्रकल्प पुण्यासाठी नव्हता तर शहरातील एक छोटा भाग विकसित करण्याचा होता. यासाठी आधीच विकसित झालेला बाणेर-बालेवाडीचा परिसर निवडला. तेथेही या प्रकल्पाच्या कामाची पूर्तता झाली नाही.

वास्तविक यूपीए सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन ही योजना राबविली गेली. त्यातून शहराच्या विकासाला ५० टक्के निधी केंद्राकडून दिला जात होता. ही योजना बंद करण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना पुढे आणली आणि जेएनएनयूआरएम ही योजना बंद पाडली. त्यामुळे केंद्राकडून ५० टक्के निधी मिळाला नाही.

स्मार्ट सिटी हे एक गाजर होते, हे नागरिकांच्या लक्षात आले आहे. आता ही योजना केंद्राने मुदत संपल्याचे कारण देऊन बंद केली आहे. त्यामुळे पुणेकरांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. मात्र, आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन स्वरूपाची योजना सुरू करण्याचा आग्रह केंद्राकडे धरू आणि पुण्याला विकासाच्या मार्गावर आणू, असा दावा धंगेकर यांनी केला आहे.

नदीसुधार, पाणी योजनेचा बोजवारा

केंद्र सरकारने पुण्यात नदीसुधार योजना गाजावाजा करून हाती घेतली. त्या योजनेलाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. समान पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा अशाच पद्धतीने उडाला आहे. आज पुणे शहरातील अनेक उपनगरे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. नागरिकांच्या या समस्यांना काँग्रेसचे सरकारच उत्तर देऊ शकते, असा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

Manmad Indore Railway Project : जोपर्यंत मोबदला जाहीर होत नाही, तोपर्यंत मोजणी नाही! मनमाड-इंदूर रेल्वे बाधित शेतकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT