पुणे

...तोपर्यंत आरक्षण राहणार - पंकजा मुंडे

सकाळवृत्तसेवा

पुणे - मराठा समाजाकडे आत्तापर्यंत सत्ता होती; परंतु मराठा समाजातील तरुणांची अवस्था बघून मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते. जोपर्यंत सामाजिक मागासलेपणा जात नाही, रोटी-बेटीचे व्यवहार विशिष्ट समाजाबाहेर होत नाहीत, तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दाही जाणार नाही, असे मत ग्रामविकास आणि महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.  

 महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटना आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, श्रीनाथ भिमाले, हनुमंत साठे, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

 मुंडे यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा, बिशप थॉमस डाबरे, साहित्यिक संपत जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, नम्रता वागळे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

मुंडे म्हणाल्या, ‘‘प्रत्येक समाजातील उपजातींना वेगळे करण्याचा घाट घातला जात आहे. जाती-पातींचे राजकारण वाढत चालले आहे. त्यामुळे आपण मागे की पुढे जाणार आहोत, याचा विचार अंतर्मुख होऊन करायला पाहिजे. अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार केवळ एकाच विशिष्ट समाजापुरता मर्यादित राहू नये, तर अन्य जातीतील व्यक्तींनाही दिला पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT