पुणे

लोणंद - लोणंदला पावणेपाच लाखाची दारू जप्त.

CD

लोणंदमध्ये अवैध दारू वाहतूकप्रकरणी कारवाई

लोणंद, ता. २९ : दारूची अवैधरीत्या चोरटी वाहतूक करणाऱ्या एकास लोणंद पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले. या धडक कारवाईत दारू व चारचाकी गाडीसह ४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, लोणंद पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांनी हद्दीत अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अंमलदार यांना सूचना दिल्या. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांना अहिरे (ता. खंडाळा) येथील राहुल सोपान पडळकर हा त्याच्या चारचाकी गाडीतून लोणंद येथून अहिरे गावात देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार श्री. जायपत्रे यांनी पोलिस हवालदार राम तांबे, साहिल पवार, अंकुश कोळेकर यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिली. हवालदार राम तांबे, साहिल पवार, अंकुश कोळेकर यांनी लोणंद -खंडाळा रस्त्यावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी राहुल पडळकर हा त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी (एमएच ११ बीव्ही ४२१४) मधून लोणंद- खंडाळा रस्त्यावरून लोणंदहून अहिरेकडे निघाला असताना त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील या गाडीतून सखू संत्रा टँगो प्रिमियम कंपनीच्या ९० मिलीच्या प्रत्येकी ४० रुपये किमतीच्या ५०० सिलबंद दारूच्या बाटल्या मिळून आल्या. गाडीसह असा एकूण ४ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून राहुल सोपान पडळकर (वय ३७, रा. अहिरे, ता. खंडाळा) यांस अटक केली आहे.
या कारवाईत सहायक पोलिस फौजदार विजय पिसाळ, विष्णू धुमाळ, पोलिस हवालदार राम तांबे, किशोरकुमार मिसाळ, अतुल कुंभार, संजय बनकर, सतीष दडस, साहिल पवार, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, शुभांगी शिंदे, स्नेहल कापसे, राणी कुदळे, जयवंत यादव, जमीर शेख यांनी सहभाग घेतला. लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

04302
लोणंद : दारूच्या अवैधरीत्या चोरट्या वाहतूकप्रकरणी मुद्देमालासह अटक केलेल्या संशयितासमवेत शिवाजीराव जायपत्रे व त्यांचे सहकारी. (रमेश धायगुडे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT